MLA Dilip Bankar comforting farmer Shantaram Jadhav whose vineyard was damaged by hail esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain: गारपीट, अवकाळीच्या तडाख्याने ‘ग्रेप्स इंडस्ट्री’ हादरली!

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरातील गावांना गारपीट व अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. ‘ग्रेप्स इंडस्ट्री’ अस्मानी दणक्याने हादरली आहे. रौळस पिंप्री, दिक्षी, दात्याणे गावात टपोऱ्या गारांनी द्राक्षपीक अक्षरश: बेचिराख केले.

गारांचा मारा झेलू न शकल्याने द्राक्ष घडांचे बागेत सडे पडले होते. शेतकऱ्यांना या वेळी अश्रू अनावर झाले. द्राक्ष पिकाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांची मोठी वाताहत झाली. (Nashik Unseasonal Rain Grapes Industry shaken by hail unseasonal blast)

द्राक्षांची पंढरी असलेल्या पिंपळगाव बसवंत परिसरासाठी आजचा रविवार ‘ब्लॅक संडे’ ठरला. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या मनात अस्मानी संकटाची धास्ती वाटत होती.

अखेर दुपारी दोनच्या सुमारास गारपीट व पावसाने हाहाकार उडवून दिला. रौळस पिंप्री, दिक्षी, दात्याणे गावांमध्ये तर गारपिटीचा कहरच झाला. सुपारीच्या आकाराच्या गारांनी मणी व फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागेवर हल्ला केला.

गारांचा तुफान मारा झाल्याने वेलीवरून द्राक्षघड कोसळून जमीनदोस्त झाले. पिंपळगाव बसवंत, साकोरे मिग, पालखेड, शिरवाडे वणी येथे विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाला. बहुतांश बागांत पाणी साचले.

गारपिटीच्या तडाख्यातून सुदैवाने वाचले असले, तरी पावसामुळे घडांना तडे, फुलोरा अवस्थेतील बागेत फळकूज होणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांचा दर्जा ढासळेल.

तीन वर्षांपासून विविध संकटांशी झुंज देणाऱ्या द्राक्ष उत्पादकांचे शुक्लकाष्ट यंदाही संपलेले नाही. रविवारच्या अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले.

द्राक्षांवर गारांचा हल्ला...

रौळस पिंप्री गावात अडीचच्या सुमारास गारांनी हल्ला चढविला. यात लाखो रुपये खर्च करून फुलविलेल्या बागांमधील द्राक्षघड कोसळले. डोळ्यांसमोर द्राक्षाची वाताहत होताना पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

चवीला गोड असलेल्या द्राक्षांना आजच्या गारपिटीची कहाणी कडू करून गेली. काही बागांमधील वेलीवर द्राक्षघड शिल्लक राहिले नाही. पानांचाही पालापाचोळा झाला. कर्जाचा डोंगर माथी असलेल्या शेतकऱ्यांसाठी आजची गारपीट दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.

आमदार दिलीप बनकर यांनी रौळस पिंप्री (ता. निफाड) येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. या वेळी शेतकरी शांताराम जाधव, किरण कुशारे, सद्दाम शेख यांना अश्रू अनावर झाले. आमदार बनकर यांनी त्यांना धीर देत शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

"गारपिटीने द्राक्ष उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. बाधित शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे."- दिलीप बनकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT