Unseasonal rain water accumulated in onion crop. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain: पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान! अस्मानी-सुलतानी संकटाने कांदा उत्पादकांचे वांदे

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दीड ते दोन तास जोरदार बॅटिंग केल्यामुळे लासलगावसह परिसरातील विंचूर, धरणगाव, रुई, कोटमगाव, थेटाळे, वनसगाव, वेळापूर, पाचोरे बुद्रुक व खुर्द, मरळगोई खुर्द व बुद्रकसह इतर गावांत कांद्याचे पीक उद्धवस्त झाले.

लेट खरीप लाल कांदा व उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाले. अंदाजे पाच ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ललित दरेकर यांनी दिले. (Nashik Unseasonal Rain Loss of five hundred to six hundred crores of onions loss growers in tension)

गेल्या हंगामात पाऊस झाल्याने लेट खरीप लाल कांद्याची लागवड उशिरा झाली. लेट खरीप कांद्याचे पीक जोमदार आले. मात्र, रविवारी झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण कांद्याचे पीकच उद्धवस्त केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत.

उन्हाळ कांद्याचे रोप पावसाच्या पाण्यात वाहून गेली, काही खराब झाल्याने पुढील उन्हाळ कांद्याचे लागवड कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त दराने कांदा घेण्याची वेळ येणार आहे.

विंचूर रोडवरील साई बाबा ट्रेडर्सची कांद्याची चाळ जमीनदोस्त झाली असून, यात साठवलेला ४०० ते ५०० क्विंटलच्या जवळपास २० ते २५ लाखांचा कांदा भिजल्याने कांदा व्यापारीचे नुकसान झाले आहे.

"रविवारी झालेल्या गारपीटीमुळे द्राक्ष, कांदा ,गहू, मका, टोमॅटो यांच्यासह शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळाने पीडित असलेल्या व आर्थिक अडचणीत असताना बेमोसमीने मोठे नुकसान झाले आहे. बाजार समितीतर्फे नुकसानग्रस्तांना शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार आहे."

-बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती

"खडक माळेगाव व परिसरात झालेल्या बेमोसमी पावसाने नुकसान झाले आहे. बळीराजा नेहमी नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहे. मायबाप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे तो कोलमडून पडला आहे. निसर्ग राजाने आता तरी बळीराजाच्या पिच्छा सोडावा."

-योगेश रायते, द्राक्ष उत्पादक, खडक माळेगाव

"पोटाला चिमटा काढून व काटकसर करून थोड्याफार प्रमाणात कर्ज घेऊन कांद्याची मोठ्या आशेने लागवड केली होती. गारपीट व पावसाने सर्व स्वप्न धुळीस मिळविले. या परिस्थितीतून किती कांदा हाती लागतो, हा येणारा काळच ठरवेल."

-चांगदेव ओझरकर, कांदा उत्पादक, आंबेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT