रेशन दुकानदार Media Gallary
नाशिक

नाशिक : लस घेणाऱ्यांनाच मिळणार रेशन अन्‌ पेट्रोल

छगन भुजबळ : औरंगाबाद पॅटर्नचा नाशिकसाठी विचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगावसह काही भागात लसीकरणाचा वेग अतिशय संथ आहे. लसीकरण वाढविण्यासाठी ‘घर घर दस्तक’ उपक्रम हाती घेतला जाणार आहे. मात्र, त्यालाही लोकांकडून प्रतिसाद मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर लस घेतली नसलेल्यांना पेट्रोल अन्‌ रेशनसह शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही. याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १२) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्‍हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित होते.

१६ लाख फिरकलेच नाही

श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्याची ७० लाख ४३ हजार लोकसंख्या आहे. त्यातील ५१ लाख ७५ हजार १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आहे. यापैकी ३५ लाख ४८ हजार ३३३ जणांनी (५० टक्के) पहिला डोस, तर १३ लाख ५२ हजार ५१४ जणांनी (१९.२० टक्के) दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात जेमतेम ५० टक्के लसीकरण झाले आहे. मात्र, मालेगावसह अनेक भागात ही टक्केवारी २७ टक्क्यांच्या आसपास आहे. तीन लाख डोस पडून आहेत. १६ लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकले नाहीत.

लॉकडाउनच्या झळा सगळ्यांनी सोसल्या आहेत. अनेकांचे रोजगार गेले, उद्योग व्यवसाय बसले आहेत. त्यामुळे लसीकरण करून घेणे सर्वांच्या हिताचे आहे. प्रशासन नाशिक शहर, ग्रामीण भागात घरोघर जाऊन लसीकरण करणार आहे. लसीकरणाला प्रतिसाद न देणाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ न देण्याबाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाप्रमाणे नाशिकला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा श्री. भुजबळ यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT