Mosquito on water stored in furniture. esakal
नाशिक

Nashik News : वणीकर डासांसह दुर्गंधीने त्रस्त! तुंबलेल्या गटारींमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना निमंत्रण

Nashik News : वणी शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांची प्रमाणात मोठी वाढ झाली असून प्रतिबंधक औषधांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गावात अनेक ठिकाणी साचलेला कचरा व त्यातून सुटलेली दुर्गंधी तसेच शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे नागरिकांनी तक्रारी झाल्यानंतर विभागाकडून अनेक भागात जाऊन पाहणी करण्यात आली. वणी शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांची प्रमाणात मोठी वाढ झाली असून प्रतिबंधक औषधांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. (Vani city people are suffering from bad smell and mosquitoes)

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे यांच्याकडून शहरातील अनेक भागात जाऊन पाहणी केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक शहरात ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत आहे. त्या बाबतच्या सूचना ग्रामपंचायतीला देत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव परदेशी यांच्या पथकाने वणीतील काही भागात जाऊन पाहणी केली.

तसेच देशमुख गल्लीत प्रमुख रस्त्यांवर एका ठिकाणी जुन्या दुकानांच्या फर्निचरचा साठा केलेला होता. ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनीही या भागात जाऊन पाहणी केली. फर्निचर साठवलेल्या व्यक्तीस साफसफाईच्या सूचना दिल्या. तसेच काही भागात गटारी तुंबल्याने डास वाढल्याचे दिसून आले. (latest marathi news)

डासांच्या उपद्रवाचा दिवसाही रहिवासी व व्यावसायिकांना त्रास होत आहे. दुकानांमध्ये बसने मुश्कील झाले आहे. मागील काही दिवसांत थंडी-तापाचे काही रुग्ण अनेक खासगी दवाखान्यांत औषधोपचार घेत होते. ग्रामपंचायतीने उपाय योजना करून नियमित शहरातील गटारी साफ करून सांडपाणी तुंबणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे.

परंतु शहरातील गटारी तुंबल्या नंतरच काढल्या जातात. त्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आदर्श प्राथमिक शाळेच्या बाजूला नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. तसेच काही भागात सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने पाणी रस्त्यावर वाहू लागते. भूमीगत गटार बनवले परंतु त्याचा फायदा झाला नाही. अनेक भागात प्लॅस्टिक कचरा साचला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT