Vegetable Market (file photo) esakal
नाशिक

Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

Nashik Vegetables Rate Hike : मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने सद्यःस्थितीत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घटली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik : मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने सद्यःस्थितीत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घटली आहे. बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. (Nashik Vegetables fruits Rate Hike)

बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी तो खरेदी करत असतात. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घटली आहे. यामुळे दर वधारले असून, स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत वाढली आहे.

फळभाज्यामध्ये सध्या काकडी व घेवडा यांची आवक अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही फळभाज्यांचे दर आवाक्यात आहेत. मात्र, दुधी भोपळा, कारली, दोडका, गिलके आदी फळभाज्यांची आवक घटली आहे.

फळभाज्यांचे दर

नाशिक बाजार समितीत सोमवारी (ता. २५) काकडी ८ ते १५ रुपये किलो, दुधी भोपळा १२ ते २० रुपये किलो, गिलके १२ ते २० रुपये किलो, दोडका १५ ते ३५ रुपये किलो, कारले ४५ ते ५५ रुपये किलो, शिमला मिरची ५५ ते ६० रुपये, हिरवी मिरची ५५ ते ६० रुपये असे दर मिळत आहेत. किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. (latest marathi news)

पालेभाज्यांचे दर

गावठी कोथिंबीर १० ते ३३ रुपये जुडी, मेथी १० ते २५ रुपये जुडी, शेपू ५ ते १५ रुपये जुडी, कांदापात ३५ ते ४८ रुपये जुडी असे भाव मिळत आहेत. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची जुडी छोटी करून दुपटीने विक्री होत आहे.

लिंबू खातोय भाव

यंदा मार्चमध्येच उन्हाचा जोरदार तडाखा वाढला आहे. या उन्हामुळे बाजारात लिंबांची मागणी प्रचंड वाढली आहे. किरकोळ बाजारात पाच रुपयांना एक, तर १५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे लिंबांची विक्री होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : मकर संक्रांतीला सोनं खरेदी करायचा विचार करताय? आधी आजचे भाव पाहा आणि मग खरेदी करा

Kolhapur Missing Ex Sarpanch : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती? कोल्हापुरातील माजी सरपंच बेपत्ता, जंगलात जळालेली हाडे सापडली अन्

वास्तव की भ्रम? मानसशास्त्रीय थ्रिलर ‘केस नं. ७३’मध्ये अशोक शिंदेंचा दमदार कमबॅक

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

Pune Temperature : पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ; दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत

SCROLL FOR NEXT