Kharif Season esakal
नाशिक

Nashik Kharif Season : जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा!

Nashik News : पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेती मशागतीला वेग आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून, दुष्काळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. असे असले, तरी पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेती मशागतीला वेग आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा लागली आहे. (Waiting for planting of Kharif in district)

दुसरीकडे शेतकऱ्यांकडून १७ हजार ८५२ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. एकवीस हजार टन खतांची विक्री झाली आहे. आठवडाभरात पेरण्यांचा प्रारंभ होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जातो. मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली असून, मृग नक्षाच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतीकामांना आतापासूनच वेग आला. शेतीची मशागत करून खरिपाच्या पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी सहा लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ झाली असून, सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, ९४ हजार हेक्टरवर भात, तर ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली जाईल.

याशिवाय, बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. खरीप हंगामासाठी दोन लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले. यात युरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन, तर एसएसपीच्या २६ हजार ५०० टनांचा यात समावेश आहे. यापैकी जूनअखेर एक लाख ४७ हजार टन खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. यातील ९४ हजार ५२३ टन खतसाठा प्राप्त झाला. (latest marathi news)

सद्यस्थितीत गेल्या वर्षीचा शिल्लक एक लाख ८१ हजार ४२६ टन असा एकूण दोन लाख ७५ हजार ९४९ टन खतसाठा शिल्लक आहे. पावसाच्या आगमनाने खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. आतापर्यंत २१ हजार ४११ टन खतांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ३९ हजार १८१ टन युरियाची विक्री झाली.

७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी आतापर्यंत ५६ हजार ३५० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. यातील १७ हजार ८५२ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. यात कपाशीचे सहा हजार ५००, भात आठ हजार २७६, बाजरी ९५० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. खते व बियाण्यांची विक्री झाली असली, तरी प्रत्यक्षात पेरण्यांना सुरवात झालेली नाही.

पेरण्यांना घाई न करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. यातच यंदा दुष्काळ असल्याने १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे पेरण्यांना प्रारंभ झालेला नाही. भात लागवडीसाठी रोपे तयार करण्याचे काम जोरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT