While pouring water with a tanker in the water supply well of the village in Umrane.. esakal
नाशिक

Nashik Water Crisis: निम्म्या देवळा तालुक्याची भिस्त टॅंकरवर! 24 गावे 37 वस्त्यांना तीस टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा

Water Crisis : देवळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची दाहकता झपाट्याने वाढत असून ३० दिवसांत २० फूट भूजल पातळी खाली गेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

देवळा : देवळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची दाहकता झपाट्याने वाढत असून ३० दिवसांत २० फूट भूजल पातळी खाली गेली आहे. सद्यःस्थितीत ९० फुटांपर्यंत विहिरींनी तळ गाठला असून तालुक्यात २४ गावे व ३७ वाड्यावस्त्यांवर ३० टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा होत आहे.

टंचाईची धग दिवसेंदिवस वाढतच आहे, यामुळे जवळपास निम्मा तालुका टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे. सध्या गिरणा नदीला आवर्तन असल्याने नदीकाठावरील पाणीयोजनांना दिलासा मिळाला आहे. (Nashik Water Crisis Half of Deola taluka on tankers news)

तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. फेब्रुवारीत तालुक्यात १५ टँकर सुरू होते, मात्र महिन्याभरात टँकरची संख्या ३० वर गेली आहे. नदी- नाले, ओहोळ, लहान बंधारे, धरणेही यावर्षी भरून न वाहिल्याने कोरडेच आहेत. अशा स्थितीत वाड्या वस्त्यांना केवळ विहिरींचा आधार उरला होता. आता तो ही संपुष्टात येऊ लागला आहे. नागरिकांसोबत जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या गावांना टॅंकरने पुरवठा

गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड, डोंगरगाव, सांगवी, वराळे, दहिवड, वाखारी, तिसगाव, शेरी, कणकापुर, पिंपळगाव, खुंटेवाडी, गुंजाळनगर,श्रीरामपूर, तिसगाव, महात्मा फुलेनगर आदी गाव व वाड्यांचा समावेश आहे.  (latest marathi news)

किशोरसागर पडले कोरडे

तालुक्यात गतवर्षी ८०० मिमी पाऊस पडला होता. यंदा ३०५ मिमी पाऊस झाला. गतवर्षांच्या तुलनेत ४९५ मिमी अत्यल्प पावसाने व पूरपाण्याने उजव्या वाढीव कालव्यावरील किशोर सागर १०० टक्के भरले होते. मात्र सद्यःस्थितीत किशोरसागरात शून्य टक्के पाणीसाठा झाला असून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

"'सद्यःस्थितीत मागणीनुसार टॅंकरने पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पुढील काळात भासणाऱ्या पाणीटंचाईसाठी किशोर सागर धरणासाठी १५ मेला २३१ दलघफू पाणी चणकापूर धरणातून पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे."- डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT