Women and girls of Hanumantpada wandering for water in the hot sun. In the second photograph, a woman drains the water that has accumulated in the well after hours esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : कोट्यवधींचा खर्च तरी मिळेना जल; पेठ तालुक्यातील आदिवासी बांधवांची रानोमाळ भटकंती

Nashik News : जलजीवन अंतर्गत अनेक गावांना पाणी पुरवठा पाइप लाइन टाकून झाली, काही ठिकाणी घरोघर दारात नळ कनेक्शन केले आहेत. मात्र उद्भव विहिरींनाच पाणीच नाही तर काही ठिकाणी अक्षरशः विहीरी कोरड्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा,

पेठ : पावसाळ्यात चेरापुंजीसारखा पाऊस कोसळणाऱ्या पेठ या आदिवासी तालुक्यात ऐन उन्हाळ्यात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानासाठी तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च झाला. मात्र अजूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्यासाठी रोजगार बुडवून हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किमीवरील झऱ्याचा शोध घ्यावा लागत आहे. (Nashik Water Scarcity)

जलजीवन अंतर्गत अनेक गावांना पाणी पुरवठा पाइप लाइन टाकून झाली, काही ठिकाणी घरोघर दारात नळ कनेक्शन केले आहेत. मात्र उद्भव विहिरींनाच पाणीच नाही तर काही ठिकाणी अक्षरशः विहीरी कोरड्या आहेत. कुठे वीजजोडणी बाकी आहे तर काही ठिकाणी विजेचे खांब उभे करणे बाकी आहे.

काही गावांना तर अजून कामच सुरू केले नाही. कोरड्या गेलेल्या विहिरींची जागा बदलून नवीन खोदाई करावी लागणार असल्याने बजेट वाढले आहे. त्याचा वाढीव प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तर ठेकेदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिसरातील विहिरींना मुबलक पाणी असूनही टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

तालुक्यातील ८५ गावांना जलजीवनची पाणीपुरवठा योजना झाल्या असून ७७ कामे अपूर्ण तर ७ गावांत अद्याप कामे सुरु नाहीत. ही योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट होते, मात्र या कालावधीत पूर्णत्वाकडे न गेलेल्या कामांना शासनाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून सप्टेंबर २०२४ पर्यंत कामे पूर्ण करण्याच्या आदेशवजा सूचना आहेत. (latest marathi news)

बहुतांश ठिकाणी या योजनेत वापरलेले पाइप निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पेठ यांच्या माहितीनुसार तालुक्यातील दहा जलजीवन योजनेतील कामे पूर्ण होऊन नळ पाणी पुरवठा सुरू केला आहे. प्रत्यक्षात मात्र कुठे विहिरीचा उपसा बाकी तर काहींचे वीज कनेक्शन, काही ठिकाणी पंप पाणी कमी फेकते, अशा अनेक अडचणी असल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

"पेठ तालुक्यातील जलजीवन योजने अंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठ्याचे कामे ठेकेदारांनी मुदत संपूनही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली नाही. त्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित गावांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू केला नाही तर प्रतिदिन दहा हजार रुपये दंड वसूल करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे." - इंजि. विशाल कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT