Igatpuri Darna Dam is dry. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : इगतपुरी तालुक्यातील 7 धरणांनी गाठला तळ; 5 वर्षात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा कमी

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सात मोठी धरणे आहेत. मात्र, यावर्षी सातही धरणांनी अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

राम शिंदे :सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सात मोठी धरणे आहेत. मात्र, यावर्षी सातही धरणांनी अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सात मोठे जलप्रकल्प असलेल्या इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात १५ टँकरद्वारे एकूण १६ गावे व ४८ वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.

धरणांच्या तालुक्यातच तसेच अर्ध्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील वाड्या- पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. कुठे गेल्या शासनाच्या जलजीवन योजना, आणि कधी येणार नळाद्वारे घरापर्यंत पाणी असा सवाल आदिवासी वाड्या-पाड्यांतील महिला उपस्थित करीत आहे. ‘हर घर नल का जल’ हीच का सरकारची जलजीवन मिशन योजना, असा प्रश्‍न आहे.

इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम, दारणा, कडवा व वाकी या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असून, धरणालगतच्या गावांनाच पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. आता मृत साठ्यावर येथील जलाशयाची मदार आहे. तर भावली धरणात अवघा शून्य टक्के साठा शिल्लक राहिल्याने पावसाला विलंब झाला तर तालुक्यातील अनेक गावांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

भाम धरणालगत असलेल्या मांजरगावच्या दोन वाड्या, भरवज, निरपनची वाडी, काळूस्तेची दरेवाडी, त्रिंगलवाडीचा बंधारा रिकामा झाल्याने त्रिंगलवाडीसह पाच वाड्यांना, तसेच वाकी धरणालगत असलेल्या वाळविहीर परिसरातील सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. (latest marathi news)

खैरगावच्या दोन वाड्या, शेवगेडांग दोन वाड्या, कुरुंगवाडीची एक वाडी, आंबेवाडीच्या दोन वाड्या, बलायदुरीची एक वाडी, वासाळीची एक वाडी, आवळखेड, बळवंतवाडी तसेच गरुडेश्‍वरच्या चार वाड्या, मायदरासह दोन वाड्या, खेडच्या दहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

हंडेमुक्त गाव घोषणा कागदावरच

इगतपुरी तालुक्यात १५ टँकरद्वारे ४१ फेऱ्यांच्या माध्यमातून १६ गावे व ४८ वाड्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, दरवर्षी यातील बहुतांश वाड्या-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टँकरमुक्त तालुका व हंडामुक्त गावे ही घोषणा कागदावर आहे. या वाड्या-पाड्यांना जलजीवन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

धरणांतील साठा (टक्केवारीत)

दारणा : १९.२१

कडवा : ०

मुकणे : १०.८७

भावली : ०

वाकी : ०

भाम : ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT