Workers filling tankers with water. Tanker standing to fill water. esakal
नाशिक

Nashik Water Shortage : सोसायट्यांना नकार, खासगी टँकरचा आधार; प्रतिव्यक्ती 135 लिटर पाण्याची

Water Shortage : उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे एखाद्या सोसायटीत टाकीतील पाण्याने तळ गाठला म्हणून महापालिकेकडून लगेचच टँकरची व्यवस्था होईल असे कोणाला वाटतं असेल तर असे वाटणे चुकीचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे एखाद्या सोसायटीत टाकीतील पाण्याने तळ गाठला म्हणून महापालिकेकडून लगेचच टँकरची व्यवस्था होईल असे कोणाला वाटतं असेल तर असे वाटणे चुकीचे आहे. त्याला कारण म्हणजे प्रतिव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणेच पाण्याचा पुरवठ्याचे नियोजन आहे. त्या व्यतिरिक्त एखाद्या सोसायटी किंवा बंगल्यात अतिरिक्त पाण्याची मागणी केल्यास महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही. (Nashik Water Shortage Denial of societies support of private tanker in city marathi news)

असे स्पष्टीकरण महापालिकेकडून मागणीच्या ठिकाणी दिले जात असल्याने अतिरिक्त पाण्याची तहान भागविण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतं आहे. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धरणांमध्ये आधीच अपुरा पाणीसाठा असताना दुसरीकडे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यातील धरणांमधील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी वरच्या अर्थात गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्याचे आदेशित केले.

त्यानुसार जवळपास ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने २२ लाख लोकसंख्येच्या नाशिकला गंगापूर धरणातून जवळपास सहाशे दशलक्ष घनफूट कमी पाणी आरक्षण मिळाले. त्यामुळे त्याचे परिणाम एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात पाणीटंचाईतून जाणवत आहे. त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात पाण्याचादेखील वापर वाढला आहे. सोसायट्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट झाला असून सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांनी तळ गाठला आहे.

पाण्याने तळ गाठल्यानंतर साहजिकच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली जात आहे. वास्तविक महापालिकेला पाण्याचा पुरवठा करणे बंधनकारक आहेच, तसा पुरवठादेखील केला जातो. मात्र वांरवार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुरवठा करणे अशक्य आहे. त्याला कारण महापालिका टँकरने पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहे असा होत नाही.  (latest marathi news)

तर केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाकडून प्रतिव्यक्ती पाणी वाटपाचे प्रमाण ठरवून दिले आहे. १३५ लिटर प्रतिव्यक्ती यानुसारच सोसायटी, बंगल्यांना पाणीपुरवठा करावा लागतो. त्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाण्याची मागणी आल्यास इमारतींचे फ्लॅट, मीटरची तपासणी, नळजोडणीचा आकार या महत्त्वपूर्ण बाबींची तपासणी केली जाते. निकष पूर्ण न झाल्यास महापालिकेकडून फारतर एकदा टँकरने पुरवठा होतो. त्याव्यतिरिक्त स्पष्टपणे नकार दिले जातात. परिणामी खासगी पाण्याच्या टँकरला शहरात मागणी वाढली आहे.

एका कुटुंबाला ६७५ लिटर पाणी

एका घरात पाच व्यक्ती गृहीत धरून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून घरांसाठी नळजोडणी देण्यात आली आहे. एका घरासाठी १५ मिलिमीटर आकाराची जोडणी आहे. घरांची संख्या वाढेल, त्यानुसार नळजोडणीचा आकार आहे. अठरा फ्लॅटची इमारत असल्यास ४० मिलिमीटर, तर २२० फ्लॅट असलेल्या इमारतींमध्ये चार इंची नळजोडणी आहे.

अठरा फ्लॅटची इमारत असल्यास एका फ्लॅटमध्ये पाच लोक याप्रमाणे इमारतीत ९० लोकांना प्रतिदिन १२ हजार १५० लिटर पाणी रोजचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्याव्यतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविल्यास एका वेळेस टँकरने पुरवठा होवू शकतो. त्यानंतर मात्र महापालिकेकडून नकार दिला जातो. अखेरीस खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते.

''नियमानुसार प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. अतिरिक्त पाणी लागल्यास फारतर एकदा टँकरने पाणीपुरवठा करता येईल. त्याव्यतिरिक्त नागरिकांना पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.''- रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

शहरात पाणी वाटपाचे प्रमाण

नळाचा आकार (मिमी) मासिक पुरवठा (किलोमीटर) घरांची संख्या (युनिट किंवा फ्लॅट)

१५ ३० १

२० ५५ ३

२५ १२० ६

४० ३५० १८

५० ६४० ३२

८० २२०० ११०

१०० ४५०० २२०

पाणी बचतीवर महापालिकेचे म्हणणे

- पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा.

- पाणी शिळे होत नसल्याने उरलेले पाणी फेकू नये.

- अंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये.

- साठवणूक टाक्यांकरिता व्हॉल्व बॉलचा वापर करावा.

- पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होवू देऊ नका.

- वाहने नळीचा वापर करून धुऊ नका.

- अंगणात व रस्त्यावर पाण्याचा सडा मारू नका.

- नळजोडणीला पंप बसवू नका.

- पाणी साठवण्यासाठी जमिनीत टाकी बांधावी.

- कमी वापर, पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया याचा अवलंब करावा.

- नळाचे टॅब दुरुस्त करावे.

- फ्लशचा वापर टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT