Construction of new water tank at Adarsh ​​Chowk here esakal
नाशिक

Nashik Water Shortage : नामपूरची पाणीयोजना अपूर्णच! 4 वर्षानंतरही जनता तहानलेली

Water Shortage : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन चार वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आलेली हरणबारी धरणातून थेट जलवाहिनीद्वारा नामपूर व चार गाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे संथगतीने सुरू आहे

प्रशांत बैरागी -सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन चार वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आलेली हरणबारी धरणातून थेट जलवाहिनीद्वारा नामपूर व चार गाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे संथगतीने सुरू आहे. हरणबारी धरणातील विहीर, फिल्टर प्लांट, शहरांतर्गत असणारी जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचे वॉटर प्रुफिंग, व्हॉल्व्ह आदी प्रमुख कामे अपूर्णावस्थेत आहेत. (Nashik Water Shortage Nampur water scheme is incomplete from 4 years marathi news)

असे असताना काम पूर्ण करण्याऐवजी आचारसंहितेपूर्वी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जलपूजनही उरकून टाकले. आता पाणी मिळेल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नामपूरचे ग्रामपंचायत सदस्य मनींद्र सावंत, मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या दिरंगाईबाबत मालेगाव येथील जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता ए. एम. चव्हाण यांची भेट घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पाणीयोजना तातडीने कार्यान्वित न झाल्यास आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शहरातील नागरिकांना पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पीक सोडत गावाला दिले पाणी

माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी शहराची तहान भागविण्यासाठी पीक सोडून ग्रामपंचायतीच्या विहिरीस पाणी उपलब्ध करून दिल्याने टंचाईची धग कमी झाली आहे. पिण्याचे पाणी बहुतांश नागरिक विकतच घेत असल्याने जारद्वारे पाणीविक्रीचा व्यवसाय वाढला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालून शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हरणबारी धरणातून थेट पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(latest marathi news)

ठेकदाराला दंड, तरीही संथगतीने

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गंत सुमारे चौतीस कोटी रुपयांची नामपूर व चार गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू असले तरी नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. या योजनेत लोखंडी पाईपलाईनचा पुरवठा शासनाकडून झाला असल्याने गोगड नामक ठेकेदाराने १७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर बिलो दराने १४ कोटी रुपयांना शासनाला सादर केल्याने कामाचा ठेका त्यांना मिळाला आहे.

गोगड यांनी प्रत्यक्ष कामासाठी उपठेकेदाराची निवड केली असून पाणीयोजनेच्या कामात दिरंगाई झाल्याने संबंधित ठेकेदारास प्रतिदिन दंडही ठोठावला आहे. त्यामुळे योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

चार वर्षांनंतरही पाणीबाणी कायम

नामपूर शहरासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी २०१९ मध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून पाणी योजनेस मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होणार आहे. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कोणत्याही गावात पाणी पोहोचले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

''जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुमारे चौतीस कोटी रुपयांच्या विनियोगातून नामपूर व चार गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून अक्षम्य दिरंगाई झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहरांतर्गत सुमारे चाळीस किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे. योजनेचे काम अपूर्ण असताना खासदारांनी जलपूजनाची घाई का केली?''- मनींद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य, नामपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT