Surgana: MP Supriya Sule speaking at Bhaskar Bhagare campaign meeting. esakal
नाशिक

Supriya Sule : हक्काचे पाणी पळवणाऱ्यांना विरोध करा : सुप्रिया सुळे

Nashik News : महाराष्ट्राचे पाणी हे महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे. पाण्याचे नियोजन केले पाहिजे. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरगाणा येथे केले.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : नार-पारचे पाणी गुजरातला पळवले जाणार आहे. या पाण्यावर पहिला हक्क येथील आदिवासींचा असेल. त्यामुळे जर आता आवाज उठवला नाही तर भविष्यात येणारी पिढी आपल्याला माफ करु शकत नाही. महाराष्ट्राची तहान भागली पाहिजे. पाण्यासाठी लढाई केली पाहिजे. महाराष्ट्राचे पाणी हे महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे. (Nashik Supriya Sule)

पाण्याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे त्याला तीव्र विरोध करा असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरगाणा येथे केले. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ येथे शुक्रवारी (ता.१७) येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख,माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित, रोहिणी खडसे, माजी आमदार नितीन भोसले.

अनिल कदम, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जयवंत दिंडे, चिंतामण गावित, रंजित गावित, अशोक बागुल, रावण चौरे, योगेश ठाकरे, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, रमेश कहांडोळे, योगेश बर्डे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे यावेळी असेही म्हणाल्या, की माकप व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या सहा दशकाचे नाते आहे.

निवडणूकीत कधी आमने- सामने उभे राहिले आहेत. मात्र यावेळी केंद्रातील हुकूमशाही सरकार हटवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने वनविभागाचा एक आदेश काढला यामध्ये आदिवासींचे मत समजून घेतले नाही. वन कायद्यासाठी आवाज उठवला पाहिजे. सध्या जमाना खराब झाला आहे. घरातीलच काही वस्तू खराब झाल्या आहेत. मतदारसंघात बॅंक चोवीस तास सुरु आहेत. (latest marathi news)

त्यामुळे बॅंक मॅनेजरला अटक झाली आहे. आज गलीच्छ आणि घाणेरडे राजकारण झाले आहे. शंभर कोटी रुपयांचे खोटे आरोप केले आहेत. सर्वांच्या विरोधात लढायचे आहे. असे सांगायलाही सुप्रिया सुळे विसरल्या नाहीत. माजी गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्ला चढवीत भारतीय जनता पार्टी आदिवासींना सन्मानाची वागणूक देत नाही अशी टीका केली.

माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी देखील मनोगत व्यक्त करताना भगरे गुरुजींची पाटी नवी कोरी आहे. मागील निवडणुकीत नवी कोरी पाटी चिरखडून आली, तसे पुनश्च व्हायला नको. ती पाटी कामाच्या यादींनी दिल्लीहून भरून आणली पाहिजे. आदिवासी जनता आता सुज्ञ झाली आहे. जो नाही कामाचा त्याला खड्यासारखे उचलून फेका असे ते म्हणाले.याप्रसंगी चिंतामण गावित, सावळीराम पवार, सखाराम भोये, कराळे गुरुजी, मोहन गांगुर्डे आदींची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT