Arrangements for parties by students of Janata Madhyamik and Higher Secondary Schools. ` esakal
नाशिक

Nashik News : भालूरच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी पाणपोई! टाकाऊ वस्तूंपासून झाडांवर पाणवठे

Nashik News : नांदगाव तालुक्यात सध्या उन्हाचा पारा वाढतच असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे शेतशिवाराचा परिसर कोरडा पडला आहे तर अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बाणगाव बुद्रूक : नांदगाव तालुक्यात सध्या उन्हाचा पारा वाढतच असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे शेतशिवाराचा परिसर कोरडा पडला आहे तर अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आटून गेले. यामुळे पाणीटंचाईच्या संकटाला येथील ग्रामस्थ, जनावरे यांना सामोरे जावे लागत आहे. अशीच परिस्थिती काही पक्ष्यांची असल्याने भालूर (ता. नांदगाव) येथील विद्यार्थ्यांना टाकावू वस्तूंपासून पक्ष्यांसाठी झाडावर पाणपोई तयार करण्यात आली आहे. (Nashik Watering for birds by students of bhalur news)

भालुर परिसरात मागील पंधरवड्यातून एकदा किंवा दोनदाच थोडेफार पाणी मिळत आहे. पक्ष्यांसाठी चोचभर पाणी आणि घासभर चारा मिळणे दुरापास्त झाले आहेत. हा संकटात सापडलेला पक्षी अधिवास जतन करून त्यांना दोन घास मिळावेत.

त्यांची दाणापाण्याची व्हावी, कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी त्यांची जास्त ओढाताण होवू नये म्हणून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पशुपक्षी आहेत निसर्गाची लेणी..दोन घास देऊनिया फेडू त्यांची देणी...’ या उपक्रमांतर्गत पक्षी संवर्धनाची मोहीम हाती घेत. टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी झाडांवर अन्नछत्र, डुंबण्यासाठी छोटे हौद, पाणी पिण्यासाठी पाणवठे आणि पाणपोई यांची निर्मिती केली.

उन्हाळ्यात दूरदूर भ्रमंती करून भटकंती करून अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मिळणं कठीण झाले होते. अशा पक्षांसाठी गडद दुष्काळात हे अन्नछत्र आधार ठरत आहेत. विद्यार्थ्यांच्या या छोट्याशा कृतीमुळे जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने चिमुकल्यांचे हे पाऊल दिशादर्शक ठरत आहेत. (latest marathi news)

"दुपारच्या रणरणत्या उन्हात एक पक्षी आकाशात उंच उडत असताना उष्माघाताने खाली मैदानावर कोसळला. त्याला उचलून सावलीत ठेवून पाणी टाकून थंड केल्यावर काही वेळात तो पुन्हा भरारी घेऊ लागला. या प्रसंगामुळे पक्ष्यांना अन्नछत्र आणि पाणपोई उभारणे गरजेचे आहेत हे लक्षात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी टाकावू वस्तुंपासून झाडावर अन्नछत्र, पाणपोई आदी तयार केले."- ज्योती काळे, प्राचार्य भालूर.

"प्राणी, पक्षी वाचले तर निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकला तरच मानव जगेल. पक्षी ही नैसर्गिक संपत्ती आहे. त्यांचे जपवणूक करणे अत्यावश्यक आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या घर परिसरात बर्ड फिडर उभारून पक्ष्यांना दानापाणी पुरवावे."- साई गरुड, विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT