corona3.jpg 
नाशिक

नाशिक ऑरेंज झोनमध्ये टाकण्याच्या हालचाली गतीमान...उद्योग सुरु होण्याची शक्यता

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. निमा व एकूणच उद्योगजगताने शासनातर्फे जाहीर निर्देशांचे पालन करत उद्योग बंद ठेवले आहेत. मात्र उद्योजकांच्या पाठपुराव्याला यश आले असून, नाशिक ऑरेंज झोनमध्ये टाकण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे उद्योग सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निमाची हमी

शासनातर्फे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनुसार  रेड, ऑरेंज व ग्रीन झोन्स तयार करण्यात आल्यानंतर सदर नियोजनात जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेण्यात आली. मालेगाव मधील रुग्णांच्या अधिक व वाढत्या संख्येमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये टाकण्यात आला होता. निमा अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि लघू-मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून शहरात ३ रुग्ण असल्याची माहिती दिली. मालेगाव तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असून संपूर्ण नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये न टाकता केवळ मालेगाव तालुक्यास 'हॉटस्पॉट' म्हणून जाहीर करावे व शहराचा रेड झोन मध्ये समावेश करू नये अशी मागणी निमा अध्यक्षांनी केली होती. उद्योजक तसेच कामगाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याने योग्य ती खबरदारी घेऊन उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी. सदर कारखान्यांमध्ये उत्पादनप्रक्रिया सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंग, जनजागृती व आरोग्यासंबंधातील खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन केले जाईल अशी हमीदेखील निमा अध्यक्षांनी चर्चेदरम्यान दिली. यावेळी उद्योजक व उद्योग यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल असा सकारात्मक विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता.

संसर्ग उद्भवल्यास त्यास सर्वस्वी उद्योजक जबाबदार

उद्योग सुरु करण्यापूर्वी शासकीय परवानगी आवश्यक असणार आहे व त्यासाठी म.औ.वि.महामंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा. उद्योग सुरु झाल्यानंतर उद्योजक व कामगारांनी कामाच्या ठिकाणी व कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण व आरोग्यासंबंधातील खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करावे. लंच व टी ब्रेक मध्ये, कंपनीत येतांना गर्दी टाळावी, निर्जंतुकीकरण करावे, मास्कचा वापर करावा, आवश्यक त्या जंतूंनाशकांची फवारणी करावी. सर्व नियमांचे काटेकोर पालन होते आहे का याची दक्षता उद्योजकाने घ्यावी. या नियमांचे पालन न झाल्यास त्यातून संसर्ग उद्भवल्यास त्यास सर्वस्वी उद्योजक स्वतः जबाबदार राहील. तरी सर्व खबरदारी काटेकोरपणे घ्यावी असे आवाहन निमा पदाधिकाऱ्यांतर्फे सर्व उद्योजक तसेच कामगारांना करण्यात आले आहे.

अहवालात नाशिकचा समावेश ऑरेंज झोनमध्ये

निमाचे प्रयत्न व पाठपुराव्यास यश येऊन नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या अहवालात नाशिकचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला असून मालेगाव रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. यामुळे शहरातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरु होण्याच्या अशा पल्लवित झाल्या असून उद्योग क्षेत्राला निश्चितच दिलासा मिळेल असा विश्वास निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, औद्योगिक विकास व धोरण समितीचे अध्यक्ष प्रदिप पेशकार, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, मानद सचिव सुधाकर देशमुख व किरण पाटील, खजिनदार कैलास आहेर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT