Hemant Godse vs Chhatrapati Sambhaji Raje esakal
नाशिक

Nashik Political News : खासदार गोडसेंच्या पिचवर संभाजीराजेंची बॅटिंग!

विक्रांत मते

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमधून निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मांडलेल्या गऱ्हाण्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. केंद्र सरकारशी संबंधित असलेले प्रश्न खासदार गोडसे यांच्यासमोर त्यांनी मांडल्याने संभाजीराजे विरुद्ध गोडसे अशी लढत नाशिककरांना बघायला मिळेल, असा तर्क लावला जात आहे. (Nashik will get to see Sambhaji Raje versus hemant Godse he raise issues related to central government to MP Godse Nashik News)

एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये एका व्यासपीठावर आले. या वेळी संभाजीराजे यांनी केलेल्या भाषणाला नाशिकच्या विकासाची धार चढल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

कोल्हापूर खालोखाल नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गड व किल्ले आहे. पर्यटनाची मोठी संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहे. सर्वगुण संपन्न असलेल्या नाशिकच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करताना फोर्ट फाउंडेशन सोबत राज्य शासनाने सामंजस्य करार करून संस्थेच्या ताब्यात दिल्यास किल्ल्यांची करण्याबरोबरच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. छत्रपती शाहू महाराज व नाशिकचे जवळचे संबंध राहिले.

पिंपळगाव बसवंत येथील गणपत मोरे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या समाजकारणाला शाहू महाराजांनी ताकद दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नाशिक विकासाच्या मुद्द्यांना हात

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नाशिकचे प्रश्न मांडले. येत्या ३० ऑक्टोबरपासून उडान योजनेअंतर्गत सुरू असलेली विमानसेवा बंद पडणार असल्याने त्यात राज्य शासनाने लक्ष घालण्याची मागणी केली. विमानसेवा सुरू असल्यास पर्यटनालादेखील चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. मात्र, संभाजीराजे यांच्या नाशिकच्या विकासासंदर्भातील वक्तव्यातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची यापूर्वी डब्यात बंद झालेल्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT