Winter  esakal
नाशिक

Nashik Winter Update: थंडीची लागली चाहूल; पाऱ्यात होणार घसरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : तापमानातील चढ-उतारानंतर आगामी आठवड्यापासून पाऱ्यात घसरण होण्याचा अंदाज हवामानखात्‍याने वर्तविला आहे.

त्‍यामुळे थंडीची चाहूल लागली असून, पाऱ्यात घसरण होण्यास सुरवात होणार आहे. बुधवारी (ता. ८) नाशिकचे किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. (Nashik Winter Update Cold weather sets in)

काही दिवसांपूर्वी नाशिकचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. परंतु त्‍यानंतरच्‍या कालावधीत ढगाळ वातावरण व इतर विविध कारणांमुळे किमान तापमानात किरकोळ वाढ झालेली आहे.

हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार आगामी आठवड्याभरात नाशिकचे किमान तापमान घसरून १३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या सुमारास राहण्याचा अंदाज आहे.

त्‍यामुळे दिवसाच्‍या वेळी तप्त ऊन आणि सायंकाळनंतर वातावरणात शीतलहरींचा सामना नाशिककरांना करावा लागण्याची शक्‍यता आहे. यंदाच्‍या हंगामात अद्याप कडाक्‍याची थंडी पडलेली नसून, दिवाळीनंतर थंडीचा तडाखा वाढण्याचा अंदाजदेखील वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT