Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: गार वाऱ्यामुळे थंडीची जाणवतेय तीव्रता!

किमान तापमान १९.६, कमाल तापमान ३०.४ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकीकडे पाऱ्यात चढ-उतार सुरू असताना, दुसरीकडे वातावरणात असलेल्‍या गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत आहे.

रविवारी (ता. ३) दुपारनंतर शहरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिले; परंतु यासोबत कमालीचा गारठादेखील जाणवत होता. किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. (Nashik Winter Update Due to wind intensity felt cold)

ऑक्‍टोबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात वातावरणात निर्माण झालेली थंडी नंतर अचानकपणे गायब झालेली होती. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतर वातावरणात पुन्‍हा एकदा थंडी जाणवू लागली आहे.

यादरम्‍यान पाऱ्यात सातत्‍याने चढ-उतार सुरू आहे. किमान तापमान सरासरी २० अंश, तर कमाल तापमान सरासरी ३० अंशांच्‍या जवळपास राहात असले तरी वातावरणात वाहत असलेल्‍या जोरदार गार वाऱ्यामुळे गारठा अधिक प्रमाणात जाणवत असल्‍याचा अनुभव नाशिककरांना येतो आहे.

रविवारीदेखील काही भागात ढगाळ वातावरण राहिले; परंतु त्‍याचा थंडीवर फारसा परिणाम झाला नव्‍हता.

पहाटेच्‍यावेळी धुक्‍याची दुलई

दिवसा सौम्‍य स्वरूपात उन्हाचा अनुभव सध्या येत असला तरी पहाटेपासून वातावरणात धुक्‍याची दुलई पसरत आहे.

तर काही भागांमध्ये ओस पडत असल्‍याचेही बघायला मिळते आहे. वाढत्‍या थंडीसोबत धुक्‍यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

सर्दी‍सह साथीच्‍या आजारांमध्ये वाढ

सध्याच्‍या विषम स्‍वरुपातील वातावरणामुळे आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. अनेक नागरिकांना सर्दी-खोकल्यायच्‍या सौम्‍य तक्रारीसह अंगदुखी, ताप व इतर संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

अशा परिस्‍थिती नागरिकांनी आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. विशेषतः श्‍वसनाचे विकार असलेल्‍या रुग्‍णांनी अधिकची खबरदारी घ्यावी, असा सल्‍ला दिला जातो आहे.

आठवडाभरातील तापमानाची स्‍थिती अशी- (अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख किमान कमाल

२६ नोव्‍हेंबर २०.४ २८

२७ नोव्‍हेंबर १८.४ २२.९

२८ नोव्‍हेंबर १९.० २८.७

२९ नोव्‍हेंबर १९.६ २८.५

३० नोव्‍हेंबर १७.७ २८.९

१ डिसेंबर १७.९ २९.१

२ डिसेंबर १९.२ २९.२

३ डिसेंबर १९.६ ३०.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT