On the occasion of International Women's Day, Nashik Bar Association, Social Justice Prabodhini Manch and All India Federation of Women Lawyers jointly organized the felicitation of accomplished women lawyers. esakal
नाशिक

Women's Day Special : बार असोसिएशनतर्फे कर्तबगार महिलांचा गौरव

Women's Day Special : जागतिक महिला दिनाच्या पार्श्र्वभूमीवर नाशिक बार असोसिएशन, सामाजिक न्याय प्रबोधिनी मंच व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तबगार महिला वकीलांचा गौरव करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या पार्श्र्वभूमीवर नाशिक बार असोसिएशन, सामाजिक न्याय प्रबोधिनी मंच व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तबगार महिला वकीलांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश एम.व्ही. भाटिया उपस्थित होते. (nashik Women Day Special marathi news)

नाशिक जिल्हा न्यायालय येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त जिल्ह व सत्र न्यायधीश आर.एम. शिंदे, पी.व्ही. घुले, दिवाणी न्यायधीश डी.पी. कडुस्कर, प्रतिभा पाटील, एस.ए. कानशिडे, ए.जी. बेहेरे, एम.बी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ महिला वकील ॲड. गायत्री उदगीरकर, ॲड. क्षमा पगार यांचाही सत्कार करण्यात आला.

तर, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या उद्योजिका कविता आव्हाड यांच्यासह महिला वकील ॲड. प्रेरणा देशपांडे, ॲड. प्रणिता जोशी-कुलकर्णी, ॲड. विनया नागरे, ॲड. सोनाली सोनवणे, ॲड. विद्या चव्हाण, अॅड. रजनी सानप, ॲड. अर्चना सानप, ॲड. दीपाली खांडबहाले, ॲड. एकता खैरे, ॲड. पुष्पा ढवळे, ॲड. वृषाली रकिबे यांचा गौरव करण्यात आला. (latest marathi news)

यावेळी शासकीय समन्वयक कविता निकम, ॲड. विजया माहेश्वरी यांनी मार्गदर्शन केले. ॲड. रेवती कोतवाल यांनी प्रास्ताविक केले. बार असोसिएशनच्या सहसचिव ॲड. सोनल गायकर यांनी संकल्पना विशद केली. ॲड. विद्या गाढे यांनी पुरस्कारर्थींचा परिचय करून दिला.

बारचे उपाध्यक्ष वैभव शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. राजश्री बारस्कर-शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे सचिव ॲड. हेमंत गायकवाड, ॲड. शिवाजी शेळके, ॲड. प्रतिक शिंदे, कविता शर्मा, तेजस्विनी शिंदे, अश्विनी शिंदे, भोसले यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT