Serial shoot esakal
नाशिक

'तुझ्या माझ्या...'च्या विवाहसोहळ्यात नाशिकच्या महिला वऱ्हाडी

संदीप पवार

डीजीपी नगर (नाशिक) : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (TMSAKH) या मालिकेच्या विवाह विशेष भागाच्या 2 तासाच्या भागाच्या अनुषंगाने मेहंदी- हळद या समारंभाचे महिलांच्या सहभागाचे चित्रीकरण शिव कॉलनी येथे करण्यात आले. यावेळी साई महिला मंडळाच्या अध्यक्षा माई बुचके, नगरसेविका सुप्रियाताई खोडे, आदीसह असंख्य महिला विवाह सोहळ्याच्या तयारीने साडी फेटे परिधान करून आल्या होत्या. यावेळी मेहंदी नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या ना साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यावेळी महिलांनी स्पर्धा व नृत्यात उस्फूर्त सहभाग नोंदवला.

विविध उखाणे, मेहंदी आणि वेशभूषा आणि मराठी गाण्यांच्या संगतीने यावेळी विशेष रंगत आणली. महिला मंडळानेही मोठ्या उत्साहाने सहभागी होत मालिकेतील खोट्या का असेना पण आपण रोजच टिव्ही वर बघत असलेल्या सिद्धार्थ आणि आदितीच्या होणाऱ्या विवाह सोहळ्याला यावेळी सर्व तयारीनिशी हजेरी लावली. याप्रसंगी उपस्थित महिलांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित नृत्यात नगरसेविका सुप्रिया खोडे, साई महिला मंडळाच्या अध्यक्षा माई बुचके यांनी ही ठेका धरत आपला सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT