Mr. Vineet Malpure esakal
नाशिक

World Youth Festival : जागतिक युवा महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा नाशिकच्या युवकांना मिळाला मान

World Youth Festival : रशिया फेडरेशनद्वारे 1 मार्च ते 7 मार्चदरम्यान रशियातील सोची येथे जगातील सर्वांत मोठ्या जागतिक युवा महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रशिया फेडरेशनद्वारे 1 मार्च ते 7 मार्चदरम्यान रशियातील सोची येथे जगातील सर्वांत मोठ्या जागतिक युवा महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरातील १८८ देशांतील १० हजारांहून अधिक रशियन आणि परदेशी युवा संशोधकांसह माध्यम, व्यापार, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संस्कृती, विज्ञान, शिक्षण आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या जागतिक युवा महोत्सवात सहभागी झाले होते. (nashik World Youth Festival marathi news)

भारतातर्फे सहभागी झालेल्या ३६० जणांच्या शिष्टमंडळामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री.विनीत मालपुरे यांना भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. जागतिक युवा महोत्सवात जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल, सांस्कृतिक बदल, डिप्लोमसी आणि युवा मंच अशा विविध विषयांवर विविध मान्यवरांचे व्याख्यान, परिषदा, कार्यशाळा आणि क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. (latest marathi news)

भारतीय शिष्टमंडळातील राष्ट्रीय युवा पुरस्कारथी विनीत मालपुरे यांनी डेनिस पुशिलिन यांच्या सोबत संवाद साधला. डेनिस पुशिलिन हे युक्रेनच्या डोनबास प्रदेशातील एक राजकारणी आहेत, जे 2018 पासून डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (DPR) चे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच ओलेग मॅटित्सिन हे रशियाचे क्रीडा मंत्री आहेत 2015 पासून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघाचे (FISU) अध्यक्ष आहेत. यांच्या समवेत देखील श्री विनीत मालपुरे यांनी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT