Qayyum Shah felicitating Arun Dhanwade for releasing the vehicle from the moneylender. esakal
नाशिक

Nashik News : सावकाराच्या ताब्यातून सोडविले तरुणाचे वाहन; ओझर पोलिसांची कारवाई

Nashik : विना परवाना सावकारी करत तीन वर्षापासून तरुणाचे बेकायदेशीररीत्या वाहन जप्त करणाऱ्या सावकारविरुद्ध ओझर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कारवाई करत अवघ्या दोन तासात व्यावसायिक तरुणाचे वाहन सोडवून त्याच्या स्वाधीन केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विना परवाना सावकारी करत तीन वर्षापासून तरुणाचे बेकायदेशीररीत्या वाहन जप्त करणाऱ्या सावकारविरुद्ध ओझर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कारवाई करत अवघ्या दोन तासात व्यावसायिक तरुणाचे वाहन सोडवून त्याच्या स्वाधीन केले. आपली रोजीरोटी ताब्यात मिळाल्यावर या तरुणाने कुटुंबीयांसह धनवडे यांचे साश्रू नयनांनी ऋण व्यक्त केले. ओझर (ता. निफाड) येथील कय्यूम शाह हा तरुण उदरनिर्वाहासाठी ओमनी व्हॅन चालवून कुटुंबाची उपजीविका करतो. (Nashik Youth vehicle released marathi news)

तीन वर्षांपूर्वी त्याला तातडीची निकड असल्याने दहावा मैल भागातील स्थानिक सावकाराकडून त्याने आपली वाहन गहाण ठेवत महिन्याला १५ टक्के व्याजाने दीड लाख रुपये कर्ज घेतले. चार ते पाच महिने व्याजाची रक्कम भरली त्यानंतर या तरुणाने सावकाराकडून घेतलेले दीड लाख रुपयेही परत करत चारचाकी वाहन परत घेण्यास गेला.

मात्र यावेळी सावकाराने त्याचे वाहन परत करण्यास नकार दिला. त्या तरुणाने अनेक वेळा चकरा मारल्या. पण उपयोग झाला नाही. यानंतर याबाबत त्याने पोलिसांकडे दोन वर्षापूर्वी तक्रार दाखल केली. मात्र त्याच्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही. शिवाय पोलिसांना तक्रार केली म्हणून संशयित सावकाराच्या काही गुंडानी शाह यास दमदाटी केली. (latest marathi news)

ओझर पोलीस स्टेशनचा पदभार अरुण धनवडे यांनी घेतल्यानंतर कय्यूम शाह याने पुन्हा एकदा पोलिसांकडे दाद मागितली. शाह यांनी श्री. धनवडे यांची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितल्यानंतर पोलिस निरिक्षक धनवडे यांनी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना बोलावून त्या सावकाराला ताब्यात ठेवलेल्या वाहनासह घेऊन येण्यास सांगितले.

ओझर पोलिसांनी दोन तासाच्या आत वाहनासह सावकाराला पोलिस ठाण्यात हजर केले. यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या भितीने सावकाराने कुठलेही आढेवेढे न घेता चारचाकी वाहन पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांचे समोर शहा यांच्या ताब्यात दिले.

बेकायदेशीररीत्या अनधिकृत खासगी सावकाराच्या ताब्यात असलेले वाहन त्या तरुणास मिळवून देऊन तरुणाच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची मोठी समस्या सोडविल्याबद्दल शहा यांच्या कुटुंबीयांनी पोलिस निरीक्षक धनवटे यांना धन्यवाद दिले. ओझर परिसरात असलेल्या विनापरवाना सावकारांचा देखील बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT