Nashik ZP
Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. चा निधी खर्चाचा टक्का घसरला!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गत वर्षी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी सुमारे ९५ टक्के निधी खर्च कर आघाडी घेतलेली असताना यंदा मात्र निधी खर्चाचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. जिल्हा नियोजन समिती, राज्य सरकार व केंद्र सरकारकडून जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या १०१३ कोटींच्या निधीपैकी केवळ ८५२ कोटी रुपये खर्च झाला आहे. (Nashik Zilla Parishad fund expenditure percentage fell)

जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी निधी वेळेत खर्च न केल्यामुळे १६३ कोटी अखर्चित निधी परत सरकारजमा करण्याची नामुष्की येणार आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी दोन आर्थिक वर्षांची मुदत असते. या मुदतीत खर्च न झाल्यास तो निधी संबंधित यंत्रणांना जमा करावा लागतो. जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, तसेच राज्य सरकारच्या काही मंत्रालयांकडूनही थेट निधी मिळतो.

तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठीचाही निधी प्राप्त होत असतो. जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून ५५० कोटी, राज्य सरकारकडून १५८ कोटी, तर केंद्र सरकारकडून ३०५ कोटींचा असा एकूण १०१३ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या खर्चासाठी जिल्हा परिषदेला ३१ मार्च २०२४ पर्यंतची मुदत होती.

या मुदतीत प्रत्यक्षात केवळ ८५२ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. यात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ५५० कोटींपैकी ४८६ कोटी, राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या १५८ कोटींपैकी १४२ कोटी, तर केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या ३०५ कोटींपैकी २२२ कोटी (७३ टक्के) रुपये खर्च झाले आहेत. (latest marathi news)

निधी खर्चात जि. प. शिक्षण, बांधकाम पिछाडीवर

जिल्हा नियोजन समितीकडून २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेल्या ५५० कोटींच्या निधीतून ६५.२७ कोटी रुपये अखर्चित राहिला आहे. हा अखर्चित निधी आता शासनदरबारी जमा करावा लागणार आहे. या अखर्चित राहिलेल्या निधीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण, जलसंधारण, बांधकाम विभाग एक व दोन यांचा समावेश आहे.

इतर विभागांचाही अखर्चित निधीत प्रामुख्याने बांधकामांसंबंधीचा आहे. बांधकाम विभाग एक, दोन व तीन यांचा मिळून २५ कोटी रुपये निधी परत जाणार आहे. शिक्षण विभागाला ६९.९७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असताना त्यातील १५.७२ कोटी रुपये निधी अखर्चित राहिला आहे. महिला व बालविकास विभागाचे सात कोटी रुपये वेळेत खर्च न केल्याने परत करण्याची नामुष्की ओढवली आहे.

विभागनिहाय झालेला खर्च (टक्केवारीत)

प्राथमिक शिक्षण (७७.५३ टक्के)

आरोग्य (८८.०४ टक्के)

ग्रामीण पाणीपुरवठा (८१.५५ टक्के)

समाजकल्याण (९७.८६ टक्के)

महिला व बालकल्याण (८८.५४ टक्के)

ग्रामपंचायत (९८.२९ टक्के)

लघुपाटबंधारे पूर्व (९३.३८ टक्के)

लघुपाटबंधारे पश्चिम (७५.५८ टक्के)

कृषी (८९.२१ टक्के)

पशुसंवर्धन (८२.६५ टक्के)

बांधकाम विभाग क्रमांक १ (८२.९८ टक्के)

बांधकाम विभाग क्रमांक २ (७८.५९ टक्के)

बांधकाम विभाग क्रमांक ३ (९३.३८ टक्के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT