Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : ‘सुपर 50’ उपक्रमात 5 हजार 700 विद्यार्थ्यांची नोंदणी

Nashik News : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे. यंदा दहा हजार विद्यार्थ्यांचे नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. (ZP Registration of 5 thousand 700 students in Super 50 initiative)

मित्तल यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या नियोजनाची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी या उपक्रमास एकूण ११० विद्यार्थ्यांची (५५ ‘जेईई’ व ५५ ‘नीट’) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू असून, ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

२१ जुलैला सकाळी अकरा ते दीड या वेळेत यासाठी परीक्षा होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निःशुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या दहावीच्या गुणपत्रकाच्या आधारे अर्ज दाखल करता येत असून, अन्य प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळी सादर करण्याची सवलत दिली जाणार आहे.

निवड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे प्रवेश अर्ज सादर करावा. संबंधित गुगल फॉर्मची लिंक सर्व गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही, त्यांनी तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात जाऊन ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून घ्यावयाचा आहे. (latest marathi news)

जेईई’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तायादी तयार करण्यात येणार असून, ‘नीट’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तायादी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित व इंग्रजी या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न असून, प्रत्येकी २५ गुण असणार आहेत.

विद्यार्थ्यांना आपले बैठक क्रमांक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र असणार आहे. या उपक्रमाच्या नियम निकषान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT