Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News: अखर्चित 49 कोटी अखेर शासन दरबारी जमा; जि. प. चा गेल्या वर्षीच्या तुलनेत निधी खर्चाचा टक्का वाढला

Nashik ZP : सर्व विभागांचे ताळमेळ पूर्ण केले असून, सर्व विभागांचा मिळून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा ४९ कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांचे ताळमेळ पूर्ण केले असून, सर्व विभागांचा मिळून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा ४९ कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे. अखर्चित राहिलेला हा निधी शासन दरबारी जमा करण्यात आला. यात आरोग्य, शिक्षण व बांधकाम विभागाचा निधी आहे. गेल्या वर्षी ११५.७४ कोटींचा निधी अखर्चित होता. यंदा यात घट झाली असून, केवळ ४९ कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे. ()

जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी दोन आर्थिक वर्षांची मुदत असते. या मुदतीत खर्च न झाल्यास तो निधी संबंधित यंत्रणांना जमा करावा लागतो. जिल्हा नियोजन समितीकडून सन २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेल्या ५५० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. ३१ मार्चअखेर यातील ६५.२७ कोटी रुपये अखर्चित राहिला होता. मात्र, ग्रामविकास विभागाने २०२२-२३ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या निधीतील कामांची देयके ऑफलाइन पद्धतीने देण्यासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली.

ही मुदतवाढ दिल्यावर १२ एप्रिलपर्यंत सर्वच विभागांनी मिळून ३२ कोटी रुपयांची देयके सादर केल्याने हा निधी खर्चाची टक्केवारी वाढली आहे. लेखा व वित्त विभागाने यंदा निधी खर्चासाठी विभागांकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे निधी खर्चाची टक्केवारी ९५ टक्क्यांवर पोहोचली. निधी खर्च करण्याची मुदत संपल्यावर लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांकडून ताळमेळ पूर्ण करून घेतला. (latest marathi news)

यासाठी महिनाभराचा कालावधी गेला. मुख्यालयातील सर्व विभाग तसेच तालुकास्तरावरील सर्व विभागांचा ताळमेळ पूर्ण झाला. यात सर्व विभागांचा मिळून ४९ कोटींचा निधी अखर्चित राहिला. यात, आरोग्य विभागाचा तीन कोटी आठ लाखांचा समावेश आहे. यातही औषध खरेदी ४६ लाख ९७ हजार, सिकलसेल आजार नियंत्रण यांचा १० लाख निधी आहे. या पाठोपाठ शिक्षण विभागाचा तीन कोटी ५४ लाख ३५ हजारांचा निधी आहे.

यात शाळा बांधकामाचा तब्बल दोन कोटी ११ लाख निधी आहे. दुरुस्त्यांचा निधीचा यात समावेश आहे. बांधकाम एक, दोन व तीन मिळून १४ कोटी २९ लाख ४३ हजारांचा निधी अखर्चित असून, हा परत जाईल. यात अंगणवाड्या, शाळा बांधकामाचा सर्वाधिक निधी आहे. हा अखर्चित निधी विभागाने शासनाकडे जमा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT