Sport Competition  esakal
नाशिक

Nashik ZP Sport Competition : महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानावर रंगणार जि.प. स्पर्धा

ZP Sport Competition : जिल्हा परिषदेत निधी खर्चाची लगीनघाई सुरू असताना अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तसेच जिल्हा परिषद फेस्टिव्हल भरविण्यावर प्रशासन ठाम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Sport Competition : लोकसभा निवडणुकांची आचार संहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत निधी खर्चाची लगीनघाई सुरू असताना अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तसेच जिल्हा परिषद फेस्टिव्हल भरविण्यावर प्रशासन ठाम आहे. या स्पर्धांसाठी जिल्हा परिषदेकडे मैदान नसल्याने स्पर्धा ह्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानावर घेण्याची निश्चित केले आहे. ()

यातही क्रिकेट रवींद्र विद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. अधिकारी, कर्मचारी यांच्यात सांघिक भावना वाढावी, एकोपा राहावा या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून दरवर्षी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कोरोना संकट तसेच यापूर्वी विविध कारणांनी या स्पर्धा भरविल्या गेल्या नव्हत्या. मात्र, गतवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धा भरविण्याचे निर्देश दिले होते.

यंदाही जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तसेच जि. प. फेस्टिव्हल २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर काम सुरू असल्याने स्व. मीनाताई ठाकरे विभागीय संकुल येथील मैदानाची पाहणी झाली होती.

मात्र, त्यावर अडचणी येत असल्याने प्रशासनाने महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानाची मागणी स्पर्धेसाठी केली होती. मैदान देण्यास अकादमी राजी झाल्याने या मैदानावरच स्पर्धा होणार हे निश्चित झाले आहे. या मैदानावर क्रिकेट स्पर्धा खेळण्यास मनाई केल्याने व्दारका परिसरातील रवींद्र विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT