Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : आघाडीच्या प्रचाराचा धुराळा, महायुतीत घडामोडी; महायुतीची उमेदवारीवर खलबते

Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) कडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) कडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर १५ दिवस उलटूनही महायुतीला उमेदवार घोषित करता आलेला नाही. आघाडीचे उमेदवार वाजे यांच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असताना महायुतीची अजूनही उमेदवारीवर खलबते सुरु आहेत.

त्यामुळे उमेदवार कोण होणार याचे वेध महायुतीच्या कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. नाशिक लोकसभेसाठी शिवसेना (ठाकरे) गटाकडून तत्कालिन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव जवळपास निश्चित होते. मात्र, नाशिकमध्ये करंजकर चालणार नाहीत, त्याऐवजी राजाभाऊ वाजे यांच्या नावाचा विचार करावा, असा निरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला.

ठाकरेंनी त्यास लगेचच सकारात्मकता दाखवत वाजेंचे नाव घोषित केले. वाजे हे शिवसेनेचे निष्ठावंत तर आहेतच, पण त्यांच्या कुटुंबाचे राजकीय योगदान मोठे आहे. वाजे यांचे नाव अचानक समोर आल्यानंतर महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. वाजेंना टक्कर देण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी दंड थोपटले.

गोडसेंबद्दल असलेल्या नाराजी नाट्यामुळे आणि भाजपाच्या 'माधव' फॉर्म्युल्यासाठी राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांचे नाव दिल्लीश्वरांकडून चर्चेत आले. आता भुजबळांमुळे राज्यभर महायुतीची अडचण होऊ शकते, अशा 'इनपूट्स'मुळे पुन्हा शिंदे गटाचे नाशिकमधील बळ वाढले आहे. काही नावांची चाचपणी नव्याने सुरु झालेली आहे. (Nashik Political news)

मात्र, काही केल्या नाशिकचा उमेदवार निश्चित होईना. या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीची प्रचारात आघाडी दिसून येते, तर महायुती उमेदवारीसाठी खलबते करतानाचे चित्र निर्माण झालेले आहे. वाजे यांचा प्रचार १५ दिवसांपासून सुरु झालेला असून महायुतीतील कार्यकर्ते मात्र उमेदवाराच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.

'बाबाही गेले, अन् दशम्याही गेल्या'

छगन भुजबळांचे नाव चर्चेत आणले आणि महायुतीनेच ते नाव मागे घेतल्यास अडचणी वाढू देखील शकतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. 'माधव' फॉर्म्युला पूर्ण करायचा झाल्यास भुजबळांशिवाय पर्याय नाही. मराठा समाजातील नेत्यांच्या दबावामुळे भुजबळांचे नाव मागे घेतल्यास ओबीसी समाजाच्या रोषाचा सामना महायुतीला राज्यभर करावा लागू शकतो.

त्यामुळे भुजबळांचे नाव चर्चेत आणून महायुतीची कोंडी झाल्याचे दिसून येते. 'बाबाही गेले, अन् दशम्याही गेल्या', अशी स्थिती निर्माण झाल्यास महायुतीच्या अडचणींत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीची अचूक राजकीय समीक्षा करुन महायुती पुढची पाऊले टाकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद

15,78,00,00,000 इतकी आहे अमिताभ यांच्याकडे संपत्ती, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरच काही...

T20 World Cup : संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार? वर्ल्डकपमध्ये आज भारत-वेस्टइंडीज टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू, ट्रम्प यांचा दावा; इराणची सत्ता कोण सांभाळणार?

LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, होळीच्या आधीच महागाईचा फटका

SCROLL FOR NEXT