Nashiks Tanmay picks up 13 wickets at state level cricket championship esakal
नाशिक

Cricket Alert : नाशिकच्‍या तन्‍मयने टिपले 13 बळी

अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (Maharashtra Cricket Association) औरंगाबाद येथे खेळविण्यात येत असलेल्‍या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत (state level invited cricket tournament) नाशिक संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सीएमए संघाचे तब्‍बल तेरा गडी बाद करतांना नाशिकच्‍या तन्‍मय शिरोडेने सोमवारी (ता.१४) क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले. सोबत नाशिक संघाने हा सामना १ डा व ३४ धावांनी जिंकला.

या स्‍पर्धेत दोन दिवसीय कसोटी (2 day test) सामने खेळविण्यात येत आहे. सीएमए संघाविरुद्धच्‍या सामन्‍यात नाशिक संघाकडून खेळतांना डावखुरा फिरकी (Spinner) गोलंदाज तन्मय शिरोडेने अफलातून कामगिरी करत एकूण १३ बळी (Wickets) घेतले. त्यामुळे सीएमए संघाविरुद्ध नाशिकने १ डाव व ३४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. काल (ता.१३) सामन्‍याच्‍या पहिल्या दिवशी कुणाल कोठावदेच्या नाबाद दोनशे धावांच्या जोरावर नाशिकने ८ बाद ३८७ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. पहिल्या दिवस अखेर सीएमए संघ २ बाद १४ धावा करु शकला होता. दुसर्‍या दिवशी तन्मयने पहिल्या डावात ७ बळी घेत सीएमएला ११९ धावात गुंडाळले. फॉलो ऑननंतर दुसर्‍या डावातदेखील त्‍याने ६ बळी घेतले. यामुळे सीएमए संघाला २०९ धावात रोखण्यात यश आले व नाशिक संघाने सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT