kho kho file photo
kho kho file photo esakal
नाशिक

National School Kho-Kho Tournament: उद्यापासून राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा; देशभरातील 1536 खेळाडूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय खो-खो स्पर्धांच्या आयोजनाची संधी नाशिककरांना मिळाली आहे. १७ व १९ वर्षाआतील मुली व मुलांसाठी होणाऱ्या या स्पर्धा २ ते १८ डिसेंबर कालावधीत पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात खेळविल्या जाणार आहेत. (National School Kho Kho Tournament from tomorrow 1536 players participated from across country nashik)

महाराष्ट्रात एकूण दहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी नाशिकला १७ व १९ वर्षाआतील खो-खो स्पर्धा होणार आहेत. १७ वर्षाआतील स्पर्धा २ ते ८ डिसेंबर या कालावधीत होतील.

तर १९ वर्षाआतील स्पर्धा ११ ते १८ डिसेंबर कालावधीत होतील. या दोन्ही क्रीडा स्पर्धांसाठी ३२ राज्यांतून १५३६ खेळाडू, १२८ प्रमुख संघ व्यवस्थापक, २५६ सहायक संघ व्यवस्थापक, २५६ प्रशिक्षक आदींसह एकूण अडीच हजार व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत.

त्यांची संपूर्ण व्यवस्था क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नाशिकमध्ये होत असल्याने नाशिकच्या खेळाडूंनाही याचा निश्चितपणे लाभ होईल.

राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी खेळाडूंनी काय काळजी घेणे अपेक्षित आहे, तसेच खेळाडूंचा वैयक्तिक अनुभवही नाशिकच्या खेळाडूंना उपयोगी ठरेल. त्यामुळे या स्पर्धा नाशिकच्या खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

SCROLL FOR NEXT