winner esakal
नाशिक

नाशिक : वृषाली, कौसल्या यांना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्टस कंट्रोल बोर्ड यांच्यातर्फे देशांतील पाच खेळातील 33 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

अरुण मलाणी

नाशिक : नवी दिल्ली (New Delhi) येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्टस कंट्रोल बोर्ड यांच्यातर्फे देशांतील पाच खेळातील 33 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यात नाशिक जिल्हयाच्या दोन खो-खो खेळाडूंची निवड केली आहे. राज्य व देशातील सर्वोत्तम आक्रमकाचा पुरस्कार विजेती वृषाली भोये व आपल्या अष्टपैलू खेळाने महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारी कौसल्या पवार या दोघींचा यात समावेश आहे.

योजनेअंतर्गत ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या नाशिकच्या पहिल्या महिला खो-खो खेळाडू आहेत. या आधी नाशिकच्या दोन पुरुष खेळाडूंना ही शिष्यवृत्ती मिळाली होती. वृषाली व कौसल्या या दोघी संस्कृती नाशिक या संस्थेच्या खेळाडू असून त्या जिल्हा खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचलित शिवछत्रपती महाराज क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्रात सराव करतात. या दोघींना उमेश आटवणे व गीतांजली सावळे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली, खजिनदार सुनिल गायकवाड व अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Al Qaeda Attack: लाल किल्ला दहशतवादी हल्ल्यामागे ‘अल कायदा’; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Pune Accident : कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल, चालकाचे नियंत्रण सुटले; ४ ते ५ वाहनांना धडक...

Marathi News Live Updates : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; प्रवाशांना खबरदारीचे आवाहन

Dharashiv Drug Raid: धाराशिवमध्ये गांजा-चरस विक्रीवर पोलिसांचा छापा; २२ तोळे सोने, रोकडसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Flat Row: मुंबईत पुन्हा मांसाहारावरून वाद! मनसेची पोलिसांत तक्रार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक

SCROLL FOR NEXT