Artisans putting the final touches on the goddess idol. esakal
नाशिक

Navratri 2024 : देवी मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात! अंतिम टप्प्यात; सप्तशृंग, दुर्गादेवी मूर्तीस मागणी

Latest Nashik News : सप्तशृंग आणि दुर्गा देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात आले. बाजारपेठेत काही ठिकाणी मूर्ती विक्रीस दाखल झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नवरात्रनिमित्त देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटचा हात मूर्तीवरून फिरवला जात आहे. सप्तशृंग आणि दुर्गा देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात आले. बाजारपेठेत काही ठिकाणी मूर्ती विक्रीस दाखल झाल्या आहेत. (Navratri 2024 Artisans final touch on Goddess idol)

अवघ्या आठ दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवला आहे. उत्सवाचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक मंडळाकडून तयारीस वेग आला आहे. अनेक मंडळाकडून देवी मूर्ती स्थापना केली जात असते. त्यानिमित्त देवी मूर्ती तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

बहुतांशी मूर्ती तयार झाली असून उर्वरित मूर्त्यांवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात आहे. आकर्षक अशा दीड ते दहा फुटापर्यंत मुर्त्या साकारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

सप्तशृंग देवी, दुर्गा देवी (शेरावाली), रेणुका देवी, तुळजाभवानी तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी अशा विविध देवी मूर्ती साकारण्यात आल्या आहे. सप्तशृंगी आणि दुर्गादेवी यांची अधिक मागणी असल्याने या मुर्त्या अधिक साकारण्यात आल्या आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातून सप्तशृंग देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याने त्यांचीही निर्मिती इतर तुलनेत अधिक करण्यात आली आहे. (latest marathi news)

दीड हजारांपासून ते ५१ हजारांपर्यंत मूर्ती विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दरांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील मंडळासह ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळाकडूनही शहरातील विक्रेत्यांकडे देवी मूर्तीची मागणी होत आहे. नागरिकांकडून घटस्थापनेच्या वेळी काहीजण देवी मूर्तीची स्थापना करत असतात. अशा नागरिकांसाठीही कारागिरांकडून लहान आकारातील देवी मूर्ती साकारण्यात आल्या आहे.

"प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग यासह इतर कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. नाशिकची आराध्य दैवत म्हणून सप्तशृंग देवीच्या मूर्तीस अधिक मागणी आहे."

- सोनू परदेशी, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT