Kalikamate is the only temple in the state with sitting idol in Old Tambat Lane. esakal
नाशिक

Nashik Kalika Mandir : बैठक अवस्थेतील कालिकामातेच्या एकमेव मंदिरात नवरात्रोत्सव सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Navratri News : राज्यात कुठे नाही, असे बैठक अवस्थेतील कालिकामातेचे मंदिर जुन्या नाशिकमधील जुनी तांबट लेन येथे आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वी कंसारा समाजातील बांधवांकडून मंदिर उभारण्यात आले होते.

तेव्हापासून आजपर्यंत या बांधवांकडून कुठलाही खंड न पडता पारंपरिक पद्धतीने पिढ्यांपिढ्या देवीची महाआरती, तसेच नवरात्रोत्सव साजरा करत आहे. (Navratri festival starts in Kalika Mata only temple in sitting position nashik news)

कालिकादेवी कंसारा समाजाचे परमदैवत आहे. तांबे-पितळाचे भांडे घडविण्याचे त्यांचे काम आहे. त्यांची कला सर्वदूर पोचावी, तसेच रोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूने गुजरातमधील चापानेर येथील कंसारा समाजातील कारागीर (बांधव) तेथून बाहेर पडले. राज्याच्या विविध भागात वस्ती करून राहू लागले.

त्यातीलच काही बांधव सुमारे ६०० वर्षांपूर्वी शहरात आले. येताना त्यांनी त्यांचे परमदैवत असलेली कालिकादेवीची मूर्ती देखील आणली. त्या वेळी जुन्या तांबट आळीत त्यांनी देवीचे लहानसे मंदिर बांधले. तांबे, पितळेची भांडी घडविण्याच्या व्यवसायास जोड म्हणून त्यानी मधल्या काळात भाले, तलवार आदी हत्यारे घडविण्याचे काम केले.

१८५७ मध्ये कंसारा समाज संस्थेची स्थापना झाली. जुन्या तांबट आळीमध्ये असलेल्या मंदिराच्या जागी नवीन लाकडी बांधणीची इमारत उभी केली.

विधिवत त्यात कालिकादेवीची स्थापना करण्यात आली. कामानिमित्ताने समाज बांधव देशात कुठेही असोत नवरात्रीमध्ये मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधीत सहभागी होऊन दर्शन घेतात.

गरबा खेळण्याचा आनंद घेतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी दशमीला होमहवन केले जाते. अष्टमीला सर्वांचाच उपवास असल्याने उकडलेले शेंगदाण्याचा प्रसाद वाटप केला जातो. इतर दिवस केवळ उकडलेल्या हरभऱ्यांचा प्रसाद असतो. श्रावण आणि चैत्र महिन्यांतील अमावास्येलाही महाआरती होत असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.

वज्रलेप न करता मूर्ती सुस्थितीत

बैठक अवस्थेतील देवीची मूर्ती काळ्या पाषाणात साकारली आहे. चार हातांपैकी एका हातात धूपपात्र, अन्य तिन्ही हातात तलवार, त्रिशूल, डमरू आहे. चेहऱ्यावर हास्य, शांत भाव दिसून येतात. सुमारे ६०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती असून, पाणी आणि एक विशिष्ट प्रकारचे आयुर्वेदिक उटण्याचा मूर्तीच्या अभिषेकसाठी वापर केला जातो. कुठलाही वज्रलेप न करताही मूर्ती अजून सुस्थितीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT