Onion esakal
नाशिक

Nashik Onion Purchase: ‘एनसीसीएफ’तर्फे कांद्याची 3 हजारांनी खरेदी सुरू; जिल्ह्यात 12 केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Purchase: कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष कमी करून वाजवी दर मिळावेत, यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात ‘एनसीसीएफ’ने तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लाल कांद्याची या माध्यमातून खरेदी सुरू झाली.

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांच्यामार्फत कांदा खरेदी केला जातो. शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेला कांदा या संस्था देशात दर स्थिरीकरण योजनेंतर्गत मागणी असलेल्या शहरांमध्ये पाठवितात. तेथे २० ते २५ रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री होते. (NCCF started buying onion at 3 thousand nashik news)

यातून ग्राहकांचा सरकारवरील रोष कमी होतो आणि शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतात, या उद्दात्त हेतूने या संस्थांची निर्मिती झाली; परंतु या संस्था आता थेट व्यापाऱ्यांकडूनच कांदा खरेदी करीत असल्याचे दिसून येते. व्यापाऱ्यांनी अगोदरच शेतकऱ्यांकडून कमी भावाने कांदा खरेदी करून तो गुदामात साठवून ठेवलेला असतो. हाच कांदा ‘नाफेड’ किंवा ‘एनसीसीएफ’ या संस्थांना काही शेतकऱ्यांच्या नावाने विकला जातो.

अशा वेळी थेट व्यापाऱ्यांना फायदा होतो, म्हणून आता शेतकऱ्यांचा या संस्थांवरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी (ता. ७) कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने लाल कांद्याचे दर हजार ते पंधराशे रुपयांनी कोसळले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असून, त्याला राजकीय रंग चढत चालल्याने केंद्र सरकारची कोंडी होऊ लागल्याचे दिसते.

यातून मार्ग काढण्यासाठी ‘एनसीसीएफ’ने मंगळवारी (ता. १२) कांदा खरेदीची जाहिरात प्रसिद्ध करून थेट शेतकरी व सहकारी संस्थांकडून तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी सुरू केली आहे. प्रतिहेक्टरी २८० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची खरेदी केली जाणार नसल्याचे ‘एनसीसीएफ’ने म्हटले आहे. जिल्ह्यातून साधारणत: दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार असल्याचे समजते. यात लाल व उन्हाळ कांद्याचा समावेश आहे.

लाल कांद्याची दुसऱ्यांदा खरेदी

‘एनसीसीएफ’मार्फत यंदा दुसऱ्यांदा लाल कांद्याची खरेदी होत असल्याचे शेतकरी सांगतात. कांद्याचा दर्जा, प्रत, गुणवत्ता पाहूनच खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बारदानी गोण्यांमध्ये पॅक केलेला तसेच ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या कांद्याचीही थेट खरेदी होत असल्याचे ‘एनसीसीएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाची खरी कसोटी

कांदा खरेदीत व्यापाऱ्यांची ‘चांदी’ होणार नाही, यावर कटाक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी आता जिल्हा प्रशासनावर असणार आहे. ‘एनसीसीएफ’ ही थेट राष्ट्रीय एजन्सी असल्याने त्या स्थानिक प्रशासनाला जुमानत नाहीत, अशा अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. आता कांद्याची खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून नव्हे, तर थेट शेतकऱ्यांकडूनच कशी होईल, याची काळजी घ्यावी लागेल.

या ठिकाणी खरेदी केंद्रे

निफाड, चांदवड, नामपूर, मालेगाव, उमराणे, पिंपळगाव, मुंगसे, लासलगाव, विंचूर, ताहाराबाद, दाभाडी, देवळा.

कांदा खरेदीसाठी अटी व शर्ती

- शेतकऱ्यांची ‘बीम’ या पोर्टलवर नोंदणी आवश्यक

- शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर खरिपाचा पीकपेरा हवा

- विळा लागलेला, पत्ती निघालेला, रंग गेलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, बुरशीजन्य, नरम झालेला, वास येत असलेला कांदा खरेदी केला जाणार नाही

- शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स सोबत आणावी

- शेतकऱ्यांना अडचण भासल्यास ७४१९४१०००७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता

- सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत खरेदी उपलब्ध

"केंद्र सरकारने ‘एनसीसीएफ’तर्फे कांदा खरेदीचा तातडीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निकषांनुसार कांदा खरेदी केला जाईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ‘एनसीसीएफ’ने सोडविल्या पाहिजे. त्यासाठी आम्हीही लक्ष ठेवून राहणार आहोत." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT