Narhari zirwal Esakal
नाशिक

Narhari zirwal: झिरवाळांकडून महायुतीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर हजेरी

Narhari zirwal: लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दिंडोरीत शुक्रवारी (ता.१०) नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना दिंडोरीत शुक्रवारी (ता.१०) नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे तिसगाव येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यास चक्क व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. व्यासपीठावरुन त्यांनी भाषण केले नाही. परंतु, कार्यकर्त्यांना हा सूचक इशारा दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथील गावकर्यांनी हनुमान मंदिराच्या भूमिपुजनाचा सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी आमदार झिरवाळ हे सकाळी आठलाच मंदिरात उपस्थित राहिले. त्याच वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचा प्रचार दौरा मंदिरात पोहोचला.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नरहरी झिरवाळ हे व्यासपीठावर बसले. पण, त्यांनी भाषण केले नाही किंवा महाविकास आघाडीची मफलरही पांघरली नाही. याठिकाणी फक्त भास्कर भगरे यांचे भाषण झाले आणि कार्यकर्ते पुढे निघाले.

इतक्यात झिरवाळ आणि शेटे या दोघांनी थोडावेळ चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने परस्पर विरोधी नेत्यांची भेट होते. पण त्यातून राजकीय गैरअर्थ काढले जातात. माझ्या मनात तसा काहीच हेतू नसल्याचा खुलासा विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी केला. झिरवाळ हे अनावधाने महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आले की, जाणीवपूर्वक त्यांनी ही खेळी खेळली याविषयी आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

लोकसभेच्या आडून विधानसभेची पेरणी

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांना निवडून आणण्यात श्रीराम शेटे यांची नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वास सहकारी म्हणून शेटे यांची ख्याती राहिली आहे. भास्कर भगरेंना त्यांनीच उमेदवार दिल्याचे दिंडोरीतील नेते सांगतात.

भगरे हे दिंडोरीचे स्थानिक आणि शेटे यांच्या गोटातील उमेदवार असल्यामुळे झिरवाळांची राजकीय कोंडी झाली आहे. महायुतीचा प्रचार करावा तर स्थानिक मतदार आणि राष्ट्रवादीचे नेतेही विरोधात जाण्याची भिती त्यांना वाटू लागली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचा उघड प्रचारही त्यांना करता येईना. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना मेसेज देण्याच्या निमित्ताने त्यांनी अक्षय तृतियेचा मुहुर्त साधल्याचे दिसून येते. याला निव्वळ योगायोग म्हटले जावू शकते. पण उभयतांमध्ये चर्चा होणे, हा काही निव्वल योगायोग नाही. यातून लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे ‘डॅमेज कंट्रोल’ यानिमित्ताने होईल, असा विचार त्यांनी केला असावा, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT