Kondajimama Awhad while felicitating Kashinath Korde. Neighbors Umesh Khatale, Gokul Pingle, Ratan Chawla, Kiran Katore. esakal
नाशिक

Nashik Political News: भाजपने शिवसेना फोडली : कोंडाजीमामा आव्हाड

शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केले, तसेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र, जनता त्यांना माफ करणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : कोरोना महामारीत अत्यंत चांगले काम महाविकास आघाडीच्या सरकारने केले होते. अडीच वर्षांनंतर भाजपने गनिमी कावा करत सरकार पाडले. भाजप सरकार करीत असलेले खेळ जनता बघत आहे.

शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केले, तसेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र, जनता त्यांना माफ करणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले. (ncp Kondajimama Awhad statement BJP broke Shiv Sena Nashik Political news)

वासळी येथील माजी सरपंच काशिनाथ कोरडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष आव्हाड यांच्या हस्ते श्री. कोरडे यांचा खंबाळे येथे सत्कार झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. देशातील सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना मोडीत काढली असून, त्यांना धडा शिकविण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांची मनोकामना उलटविली पाहिजे.

धरणग्रस्तांचा इगतपुरी तालुका असून, तालुक्यात बेरोजगारी आहे. त्यामुळे तरुणांच्या रोजगारासाठी खऱ्या अर्थाने चळवळ आपण सर्व मिळून उभी करू, असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी या वेळी सांगितले.

प्रदेश सचिव गोकुळ पिंगळे, संघटक सचिव उमेश खातळे, श्‍यामराव हिरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे किरण कातोरे, रतन चावला, सोमनाथ घारे, तेजस भोर, नथ्थू पिचड, भिका पानसरे, सागर टोचे, नवनाथ लहांगे, निर्मला भोईर आदींनी मनोगत व्यक्त केले.

तानाजी आव्हाड, सुदाम शिंदे, तेजस गोरे, वाकीचे माजी सरपंच देवराम मराडे, वासाळीच्या सरपंच सुनीता कोरडे, माजी सरपंच एकनाथ खादे, लक्ष्मण कोरडे, लक्ष्मण धांडे, शंकर कोरडे, सखाराम जोशी, भरत कोरडे, विष्णू कोरडे, किसन कोरडे, सुलोचना खादे,

गणेश खाडे, राजाराम खादे, कोंडाजी कोरडे, किसन कोरडे, बाळू कचरे, सरपंच सुरेश ढगे, सुरेखा हांडगे, सरपंच पंढरीनाथ खाडे, लक्ष्मण धांडे, गणेश खांडे, तुकाराम खाडे, प्रतिभा दिवटे, कल्पना भांगरे, सुनीता लोटे, लक्ष्मण घुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT