NDCC Bank Nashik
NDCC Bank Nashik esakal
नाशिक

NDCC Bank Kharif Loan : जिल्हा बॅंकेकडून 'या' तारखेपासून खरीप पीक कर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हयात रब्बी हंगाम आटोपता आल्याने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सन २०२३-२४ पीक कर्जवाटप हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. एक एप्रिल २०२३ पासून जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरु होत आहे. (NDCC Bank Kharif Crop Loan Allotment from District Bank from 1 april nashik news)

शासनाने जिल्हा बँकेला गत हंगाम सन २०२२-२३ खरीप पीककर्ज वितरणासाठी ५१५ कोटीचे लक्षांक दिलेले होते. बँकेने पीककर्जासाठी दिलेला लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असून जिल्हा बँकेने ५२ हजार सभासदांना रक्कम ४६४ कोटीचे पीककर्ज वाटप केलेले आहे.

लक्षांकाच्या ८० टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यंदाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. एक एप्रिल पासून हे पीक कर्ज बॅंकेच्या विविध शाखांमधून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार व केंद्र शासनाची २ टक्के व्याज परतावा योजनेनुसार नियमित पीककर्ज घेऊन त्याची परतफेड मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्याना रक्कम तीन लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीककर्ज हे शून्य टक्के व्याज दराने देण्यात येत असते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तरी शेतकरी सभासदांनी सन २०२२-२३ हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचा ३१ मार्च २०२३ पूर्वी कर्ज भरणा करावा, नियमीत कर्जाची परतफेड करणारे सभासदास माहे एप्रिल मध्ये त्वरित नवीन पीककर्ज उपलब्ध करून देणेस बँक कटिबद्ध आहे.

सन २०२३-२४ हंगामात पीक कर्ज उचल करणेस पात्र होऊन शासनाच्या तीन लाखा पावेतोचे पीक कर्जास शून्य टक्के व्याजाच्या सवलतीचा लाभ घेणेसाठी त्वरित जुने कर्ज भरणा करून नवीन तीन लाखापावेतोचे शून्य टक्के व्याजदराने सवलतीचे पीक कर्ज उचल करावे व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

कर्जदार सभासदांसाठी संबंधित विविध कार्यकारी संस्थेत/शाखेत हिशोब मिळण्याची सुविधा केलेली आहे. २५ मार्च व ३० मार्च २०२३ या सुट्टीच्या दिवशीही बँकेच्या शाखेत कर्जवसुलीचे कामकाज सुरु राहील. तरी सर्व सभासदांनी ३१ मार्च अखेर पीक कर्जाचा भरणा करून सन २०२३-२४ हंगामासाठी पात्र व्हावे, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT