Crime News esakal
नाशिक

Nashik : घंटागाडीच्या कचऱ्यात आढळली ‘नकोशी’!

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : घंटागाड्यांमधून कचरा संकलित करून खत प्रकल्पात टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढीगाऱ्यात शुक्रवारी (ता. १८) सकाळी २४ तास वय असलेले स्त्री जातीचे मृत अभ्रक आढळून आले. (new born girl child found in garbage of hourglass Nashik Latest Marathi News)

इंदिरानगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, दिवसभर पूर्व विभागातील घंटागाडी कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमाराला खत प्रकल्पात जमा झालेल्या कचऱ्यात स्त्री जातीचे अभ्रक मिळाल्याची माहिती येथील पर्यवेक्षकाने पोलिसांना दिली. शहरभर फिरणाऱ्या घंटागाड्या कचरा संकलित करतात आणि हा कचरा येथे टाकला जातो.

त्यामुळे हा कचरा नेमका कोणत्या घंटागाडीमधून आला, हे कळने आता अवघड झाले आहे. जुन्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत हे अभ्रक टाकण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी पूर्व विभागातील घंटागाडीवर कचरा संकलित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT