नाशिक

Nashik Politics News: भुजबळ-भुसेंना चेकमेटसाठी कर्णिकांची एन्ट्री; गिरीश महाजनांचे वाढले बळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Politics News: राज्यात ट्रिपल इंजिन सरकारमुळे वेगाने विकास होत असल्याचे मानले जात असले तरी ट्रिपल इंजिन सरकारमधील घटकांमध्ये एकमेकांना मोठे होण्याची होऊ न देण्याची स्पर्धादेखील सुरू आहे. त्यामुळेच नाशिक शहरात समसमान ताकद असलेले तीनही पक्ष स्वबळ वाढविण्याचा प्रयत्न करत असून, त्यातून एकमेकांना शह-काटशह देण्याची एकही संधी सोडत नाही.

नवीन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नाशिकमधील पोलिस दलप्रमुखांच्या रूपाने झालेली एन्ट्री ही भाजपकडून विद्यमान पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ या दोघांना शह देण्यासाठीच असल्याचे मानले जात आहे. (new police commissioner entry is To support dominance of Bhujbal and Bhuse nashik news)

नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात ड्रग्ज कारखाना मुंबई पोलिसांनी उद्‌ध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी लुटूपुटूची कारवाई करून कार्यक्षमता सिद्धा करण्याचा प्रयत्न केला; परंतु मुंबई पोलिस तोपर्यंत संपूर्ण राज्यभरातील ड्रग्ज माफियांपर्यंत पोचले.

मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या विश्‍वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली. त्यामुळे त्याचवेळी नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा होती. परंतु लगेचच कारवाई झाली नाही. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या वेळची चर्चा खरी ठरली.

ड्रग्ज कारखाना छाप्याप्रमाणेच पोलिस आयुक्तांची बदलीदेखील गुप्त ठेवण्यात आली. परंतु कर्णिक यांच्या नियुक्तीमागे एक राजकीय किनारदेखील असल्याचे बोलले जात आहे. ती चर्चा भुजबळ व भुसे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची आहे.

महाजनांचे पारडे जड

नाशिकमध्ये काही महिन्यांत क्राइम मोठ्या प्रमाणात वाढले. खुनाच्या घटना नित्याच्या झाल्या असतानाच ड्रग्जचा कारखानाच पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. पोलिसांच्या कारवाईनंतर नाशिकमध्ये राजकारण रंगात आले. शिवसेनेने मोर्चा काढून थेट पालकमंत्री दादा भुसे व नाशिकच्या एका महिला आमदारावर शरसंधान केले. दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील (पानपाटील) याचे ‘उबाठा’ सेनेच्या पदाधिकायांसमवेत फोटो व्हायरल झाले.

शिंदे सेनेबरोबरच भाजपच्या नेत्यांचे देखील या प्रकरणात नाव आले, तर दुसरीकडे पालकमंत्री पदासाठी देखील मोठी चढाओढ सुरू आहे. महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तिसरे इंजिन जोडले गेल्याने मंत्रिपदासह पालकमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीने जोर लावला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणसाठी पालकमंत्र्यांची नावे जाहीर करताना झालेल्या नाराजीवरून प्रकार समोर आला.

त्यात लातूर व धुळे पालकमंत्री असताना देखील भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यामुळे नाशिकची सूत्रे हाती घेण्याची महाजन यांची इच्छा लपून राहिली नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील महाजन यांना पुन्हा या, असे साकडे घातले. पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत शिंदे सेनेने बाजी मारली. त्यामुळेच शहरावर पकड ठेवण्यासाठी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी संदीप कर्णिक यांच्याकडे नाशिक पोलिस आयुक्त पद दिल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेचा निषेध

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT