smart city 1.jpg 
नाशिक

दोनशे कोटींच्या रस्त्यांचा नव्याने घाट; मागील वर्षीची कामे अद्याप अपूर्ण  

विक्रांत मते

नाशिक : मागील वर्षी मंजूर केलेली रस्त्यांची कामे अपूर्ण असताना नव्याने दोनशे कोटींचे रस्ते तयार करण्याचा घाट घातला जात आहे. पूर्वीच्या रस्त्यांची कामे कोरोनाचे कारण देत अपूर्ण असून, नव्याने रस्ते तयार करण्याची निविदा काढण्यासाठी बांधकाम विभाग सरसावला आहे. 

मागील वर्षीची कामे अद्याप अपूर्ण 
सिंहस्थात महापालिकेतर्फे रस्ते तयार करण्यात आले. तीनशे कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण होताना दोन वर्षे लागले. निवडणुका होऊन महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपने २०१७ मध्ये अडीचशे कोटींचे रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाला ब्रेक लावला. मुंढे यांच्या बदलीनंतर १५७ कोटींचे रस्तेकामाला मंजुरी देण्यात आली. रस्त्याची कामे सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मजूर मिळत नसल्याचे कारण देत कामे पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आधीच कामे अपूर्ण असताना काही ठेकेदारांची बिले काढल्याची चर्चा आहे.

लॉकडाउनमुळे कामे बंद

एकीकडे कार्यारंभ आदेश दिलेली कामे अपूर्ण असताना नव्याने दोनशे कोटींच्या नवीन रस्त्यांची कामे काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जानेवारीत रस्त्यांची कामे सुरू झाली होती. लॉकडाउनमुळे कामे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. आता दिवाळीनंतर डांबराचे प्लांट सुरू होणार असल्याने रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा दावा शहर अभियंता संजय घुगे यांनी केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT