Repairing work of Tehsil Office started. esakal
नाशिक

Nashik Tehsildar Office : नवीन इमारत होणार, तरीही तहसिल कार्यालयाची डागडुजी! वर्षानुवर्षे पडला पायंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tehsildar Office : नाशिक तालुका तहसिल कार्यालयाची नव्याने डागडुजी सुरु झाली आहे. दरवेळी नवीन तहसीलदार आले म्हणजे नवी रचना असा नाशिक तहसिल कार्यालयाचा पायंडाच पडला आहे.

सध्याही नव्याने बदलून आलेल्या तहसिलदारांनी कार्यालयाची डागडुजी सुरु केली आहे. यावेळचे विशेष म्हणजे, काही आठवड्यापूर्वीच नाशिकला नवीन तहसिल कार्यालयाची इमारत उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. (new will build old nashik Tehsil Office repaired over years news)

दीड दोन वर्षात नवीन तहसिल कार्यालय होणार असतानाही आहे त्या कार्यालयाची पडझड करून नवीन इमारत उभारली जात आहे. एका बाजूला शासकीय तिजोरीत खडखडाट असल्याच्या बातम्या आहे.

६ हजार कोटीहून अधिकची देयके प्रलंबित आहे. एकट्या नाशिक लेखा कोशागारात ३१०० हून अधिक धनादेश दिले गेले आहेत. राज्यात नव्याने २२ जिल्हे निर्माण करण्याचा विषय आर्थिक तंगी अभावी रखडला असताना नाशिकला मात्र दरवेळी तहसीलदार बदलला म्हणजे इमारतीची डागडुजीची तोडफोड चर्चेचा विषय झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नवीन इमारत अन्‌ प्रशासन उदार

यंदाच्‍या आर्थिक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वापरासाठी नवनवे नियम लागू होत आहे. त्यात, यंदा प्रत्येक जिल्ह्याला विकास आराखडा करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. निधी खर्चाचे त्रैमासिक सूत्र ठरविले गेले आहेत.

तत्पूर्वी विभागीय आयुक्तांच्या पातळीवर इमारती नसलेल्या तालुक्यांसाठी नव्याने तहसिल कार्यालयाच्या इमारती उभारण्याचे निश्चित झाले असून दिंडोरी आणि नाशिकला नवीन तहसिल कार्यालयाची इमारत उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे.

मान्यता मिळाल्यानंतर आता नवीन तहसिल कार्यालयाच्या इमारतीसाठी निधीचे नियोजन होणार आहे. एकाचवेळी नवीन इमारतीसाठी निधीचे नियोजन होणार आणि त्याचवेळी तोडफोड करीत जुन्या कार्यालयाची डागडुजीही होणार आहे. एकूण काय नाशिक तहसिल कार्यालयाच्या इमारतीसाठी प्रशासन उदार झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT