Gaurav & Neha Jagtap esakal
नाशिक

Nashik News : आर्थिक विवंचनेतून नवदाम्पत्याची गळफास घेत आत्महत्त्या!

नरेश हाळणोर

नाशिक : नोकरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना आणि वाढत्या कर्जामुळे आलेल्या नैराश्‍यातून अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह केलेल्या नवविवाहित दाम्प्त्याने एकत्र गळफास घेत आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाथर्डी फाटा परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीमध्ये सदरची घटना घडली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Newly married couple commits suicide due to financial hardship Nashik News)

गौरव जितेंद्र जगताप (29), नेहा गौरव जगताप (23, दोघे रा. अनमोल नयनतारा गोल्ड, हॉटेल सेव्हन हेवनच्या मागे, पाथर्डी फाटा, इंदिरानगर) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी गौरवचा विवाह नेहा यांच्याशी थाटामाटात झाला होता. गौरव हे सातपूर येथील पेडीलाईट कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे तो तणावात होता. नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण होऊन कर्ज वाढल्याचे समजते.

त्यामुळेच दोघांनी संगनमत करुन टोकाचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांनी सांगितले. याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत गौरव व नेहा यांच्यावर सोमवारी (ता. १९) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत गौरवचे वडील हे जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत आरोग्य सेवेत कार्यरत आहेत.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हॉलमध्ये घेतला गळफास

गेल्या रविवारी (ता. १८) सायंकाळी नेहाला तिच्या मावशीने फोन केला होता. मात्र तिने फोन उचलला नाही, म्हणून त्यांनी गौरवचा भाऊ यश जगताप यास फोन करुन गौरव आणि नेहा फोन उचलत नसल्याचे सांगितले. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या यश हा भाऊ गौरव व नेहा यांना बघण्यासाठी अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीतील त्यांच्या घरी पोहोचला. घराच्या दरवाजा बंद होता.

त्यांनी दरवाजा वाजविला, आवाज दिला मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यश व त्याचे काका अरुण गवळी यांनी सोसायटीतील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा गौरव व नेहा या दोघांनी हॉलमधील सिलिंग हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT