manjarpada dam Sakal
नाशिक

यंदा डोंगरगावपर्यंत पाणी येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

कालव्याच्या पाण्याने तालुका जलसमृद्ध होईल आणि दुष्काळ पुसला जाईल, या अपेक्षेवर गेल्या ४९ वर्षांपासून ईशान्य भागातील शेतकरी डोंगरगावच्या तलावात पाणी पोचण्याची प्रतीक्षा करत आहेत.

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोच कालव्याच्या (canal) पाण्याने तालुका जलसमृद्ध होईल आणि दुष्काळ पुसला जाईल, या अपेक्षेवर गेल्या ४९ वर्षांपासून ईशान्य भागातील शेतकरी डोंगरगावच्या तलावात पाणी पोचण्याची प्रतीक्षा करत आहेत. मागील वर्षी बाळापूरपर्यंत पाणी पोचले असून, यंदा ते डोंगरगावपर्यंत जाण्याचा आशावाद व्यक्त होत आहे. त्यातच मांजरपाडा धरणाच्या भिंतीची उंचीही वाढविली जात असल्याने या पूरक कामांमुळे पाणी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (Citizens have been waiting for water to reach Dongargaon lake for 49 years)

कालव्याच्या कामाला नवसंजीवनी

पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव या कालव्याचे काम माजी आमदार (कै.) जनार्दन पाटील यांच्या संकल्पनेतून १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या कालव्याचे काम सुरू झाले; पण ते रखडले होते. पुढे २००६ मध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे कालव्याच्या कामाला नवसंजीवनी मिळाली. पुणेगाव धरणापासून दरसवाडी धरणापर्यंत आणि दरसवाडीपासून बाळापूरपर्यंत या कालव्याचे काम पूर्ण झालेले आहे. किंबहुना २०१९ मध्ये कालव्याला बाळापूरपर्यंत पाणी आल्याने तिसऱ्या पिढीतील सदस्यांची ही स्वप्नपूर्ती झाली अन् या भागातील शेतकऱ्यांनी गुढ्या उभारत स्वप्नपूर्तीचा आनंद घेतला होता. मागील वर्षी धरण क्षेत्रात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने धरणे ओव्हररफ्लो(Overflow) न झाल्याने कालव्याच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले होते.

कालव्याची चाचणी यशस्वी

उनंदा नदीतील वाहून जाणारे पाणी गुजरातसह समुद्रात वाहून जात होते. हेच पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले. ६०६ दलघफू पाणी मिळाले. दक्षिणेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळविणारा हा एकमेव प्रकल्प आहे. मांजरपाडा प्रकल्पातून १०.६ किलेमीटर बोगदा, १२ वळण बंधारे तयार करून पाणी उनंदा नदीत सोडण्यात आले. उनंदा नदीच्या उघड्या चरातून ३.५ किलोमीटरचा प्रवास करत पाणी पुणेगाव धरणात सोडण्यात आले आहे. पुणेगाव ते दरसवाडी कालवा हे फक्त ६३ किलोमीटर अंतराचा, मात्र यापूर्वी कधीही या कालव्याची चाचणी यशस्वी झाली नाही. मांजरपाडाचे शास्वत पाणी प्राप्त झाले. अनेक अडचणी पार करत दोन वर्षी दरसवाडी धरण या कालवयाच्या पाण्याने भरल्याने २०१९ मध्ये १६ दिवसांचा प्रवास करत पाणी बाळापूर बंधाऱ्यात पडले होते.

कामाला वेग, पाण्याकडे लक्ष

तालुका सुजलाम सुफलाम करणाऱ्या‍या मांजरपाडा प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पाणी अडवणाऱ्या मुख्य भिंतीचे काम पूर्ण झाले असून, त्यावरील रस्त्याचे कामही येत्या १५ ते २० दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम अनकुटे येथील रेल्वे क्रॉसिंग वगळता जवळपास पूर्ण झालेले आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किलोमीटरमध्ये या आधी कालव्याच्या पाण्याची चाचणी झाली असून, पाणी येताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी यांत्रिकीकरण विभागाकडून चार पोकलॅन्ड(Pokland), दोन जेसीबी(JCB), दोन डंपरच्या(Dumper) सहाय्याने युद्धपातळीवर काम सुरू आहे. बाळापूर ते डोंगरगावमधील कालवा साफसफाई, अपूर्ण कामे सुरू आहेत. रेल्वे क्रॉसिंगचे बॉक्स तयार असून, संबंधित बॉक्स फक्त रेल्वेलाइनखाली शिफ्ट करायचे आहेत. या कामास रेल्वे प्रशासनच्या तांत्रिक अडचणीमुळे उशीर होत आहे. पावसाळ्याच्या अगोदर हे काम निश्चित पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. मांजरपाडा प्रकल्पाची मुख्य भिंत पूर्ण झाल्याने या वर्षी या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी दरसवाडीत धरणात पोचण्यासाठी कालवा प्रशासन सज्ज आहे. पाणी आवर्तन अगोदरची कालवा साफसफाई पूर्ण झालेली आहे. दरसवाडी ते डोंगरगावपर्यंत यांत्रिकीकरण विभागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात पाणी निश्चितच डोंगरगावपर्यंत पोचेल, असा विश्वास सध्या तरी व्यक्त होत आहे.

या वर्षी तालुक्यात पाणी पोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

''मांजरपाडा प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम पूर्ण झाले असून, कालवा साफसफाईचे कामही पूर्ण झाले आहे. बाळापूर ते डोंगरगावदरम्यान काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनकुटे येथील रेल्वेपुलाचे कामही येत्या काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. मांजरपाड्याच्या पाण्याने आमच्या तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती आणि छगन भुजबळ यांची शब्दपूर्ती पावसाळ्यात पूर्ण होईल.''

-मोहन शेलार, पाणी आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT