News about pm kisan scheme works Nashik Marathi News 
नाशिक

‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा नकार; कामे कृषी विभागाकडून करून घेण्याची मागणी 

विनोद बेदरकर

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित कामे करण्यास तलाठ्यांनी नकार दिला आहे. याबाबत तलाठी यापुढे ‘पीएम-किसान’चे काम करणार नसून हे काम कृषी विभागामार्फत करून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा तलाठी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिले. 

राज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ‘पीएम किसान’च्या विषयाला अनुसरून होणाऱ्या त्रासाबाबत माहिती देत योजनेचे कामकाज नाकारण्याबाबत मत व्यक्त केले होते. सद्यःस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी यांना महसूल विभागाशी निगडित मूळ महसुली कामकाज करावे लागते. ज्यामध्ये निवडणुका, संजय गांधी योजनेचे लाभार्थी शोधणे, वसुली अशी अनेक कामे करावी लागत आहेत. यासह सातबारा संगणकीकरण, ई-चावडी योजना अंतिम टप्प्यात आहे. यांसह नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अनुदानवाटप यासारखी कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर इतर कामकाजाशी निगडित असलेल्या अतिरिक्त कामाकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे महसुली व बिगरमहसुली कामे पाहता योजनेचे काम नियोजित वेळेत करण्यास विलंब होत असून, त्याची जबाबदारी तलाठ्यांवर टाकण्यात आली आहे. हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे या योजनेकडे पूर्ण क्षमतेने योजनेच्या अनुषंगाने कामकाजाकडे पूर्ण क्षमतेने लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे यापुढे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे काम देऊ नये, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस बाबासाहेब खेडकर, कार्याध्यक्ष एम. एल. पवार, अध्यक्ष नीळकंठ उगले यांसह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT