news about politics in mns over missal party nashik marathi political news 
नाशिक

मिसळ पार्टीतून मनसेत राजकारण टोकाला; वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांची हजेरी 

विक्रांत मते

नाशिक : भाजपच्या चार वर्षांच्या कारभारामुळे मतदार नाराज असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेला शहरात चांगले वातावरण आहे. परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा इनकॅश करता येत नसल्याने गेल्या महिन्यात थेट राज ठाकरे यांच्या दरबारात हजेरी लावून व्यथा मांडल्यानंतर ठाकरे यांनी संघटनेत बदल करण्याचे दिलेले संकेत लक्षात घेत वसंत गिते यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आदेश नसतानाही कार्यकर्ते मिसळ पार्टीत सहभागी होण्यामागे हेच प्रमुख कारण असल्याने त्यावरून मनसेत धुसफूस सुरू झाली आहे. 

गितेंच्या मिसळ पार्टीची चर्चा

शिवसेना, मनसे व आता भाजपमध्ये असलेले प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका असल्याने राजकारणात ते पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. नववर्षाच्या स्वागताचे निमित्त साधून गिते यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीवरून गिते पक्ष बदलणार, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. मिसळ पार्टीमध्ये मनसेच्या माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. गिते यांनी पुन्हा मनसेत यावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पार्टीच्या आदल्या दिवशी मनसेच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावरून संदेश देत पार्टीला हजेरी लावल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला होता. तो इशारा झुगारून प्रमुख पदाधिकारी वगळता सर्वांनीच हजेरी लावली. 


मनसेच्या बंडाची शस्रक्रिया 

मनसेच्या पहिल्या फळीतील नेते सक्रिय नसल्याने दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात राज ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेत व्यथा कथन केली. ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात मी येत असून बघतो, असा संदेश वजा इशारा दिल्याने पहिल्या फळीतील नेत्यांचे धाबे दणाणले. दुसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याने त्याचे रुपांतर मोठी पदे मिळण्यात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गिते यांनाच पक्षात ओढून दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाची शस्रक्रिया खेळण्याची चाल खेळल्याचे बोलले जात आहे. गिते यांच्या पार्टीत सहभागी होण्याच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या सूचना राजकारणाचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT