health admission.jpeg 
नाशिक

महत्वाची बातमी : "आरोग्य'च्या पदव्युत्तर प्रवेशाच्या अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमातील एम.एस.सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर ऍडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अभ्यासक्रामांना प्रवेशाकरीता पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 22 जुलैपर्यंत असेल. 
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.म्हैसेकर म्हणाले, की आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नाविण्यपुर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करीयरच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणारे तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविण्यपुर्ण संधी उपलब्ध करुन देणारे हे अभ्यासक्रम आहेत. 

पदवी, पदविकेच्या विद्यार्क्ष्यांना प्रवेशाची संधी 
प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामंगावकर म्हणाले, की विद्यापीठाच्या मास्टर इन पब्लिक हेल्थ न्युट्रिशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पोषणविषयक विशिष्ट कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्रम उपयुक्‍त आहे. 
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, की एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटल सेवेचे सुयोग्य नियोजन, रुग्ण सेवेबाबत व्यवस्थापन आदी सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरेल. एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना औषध निर्मिती संदर्भातील क्‍लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फॉर्माको व्हिजीलन्स रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिको मार्केटिंग, क्‍लिनिकल रिसर्च आणि क्‍लिनिकल डाटा व्यवस्थापन आदी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते. याकरीता सध्याची परिस्थिती व भविष्यात करियरची चांगल्या संधी उपलब्ध आहेत. 

हे विद्यार्थी घेऊ शकता प्रवेश 
एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशनच्या प्रवेशकरीता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्रमाचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. तसेच एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमासाठी आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी तसेचे बी.एस्सी, बी.फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत 22 जुलैपर्यंत असेल. केंद्रिय सामायिक परीक्षेबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द केली जाईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT