NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik News : NMC प्रशासनाचा थकबाकीदारांना नळजोडणी खंडीत करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता मिळकतधारक व नळ कनेक्शनधारकांना महापालिका कर विभागातर्फे मिळकतधारक, भोगवटादारांना मालमत्ता कराचे व नळ कनेक्शनधारकांना पाणीपट्टीचे देयके पाठविण्यात आली आहेत.

शहरातील ज्या करदात्यांनी कराचा भरणा अद्यापही केलेला नाही अशा करदात्यांना नियमाप्रमाणे अंतिम सूचनापत्र व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस देण्यात आली आहे. यानंतरही कराचा भरणा न करणाऱ्यांची स्थावर मालमत्ता जप्त करणे व नळजोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (NMC administration warns defaulters to disconnect water supply Nashik News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मालमत्ता करात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ७० टक्के दंडनीय व्याजात सूट तर १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत दंडनीय व्याजात ५० टक्के सुटे देण्यात आलेली आहे. या संधीचा करधारकांनी लाभ घ्यावा. मिळकत जप्ती व मालमत्ता लिलावाची कटु कारवाई टाळावी. असे आवाहन केले आहे.

मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी आजपासून ३१ मार्चपर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळता प्रभाग कार्यालयात वसुली, कराचा भरणा स्वीकारण्यासाठी नागरी सुविधा केंद्र नियमित कार्यालयीन वेळेत सुरू असेल. शहरवासियांनी कराचा भरणा वेळेत करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT