Potholes latest news esakal
नाशिक

तुम्ही रस्त्यांवरून फिरत नाही का?; आयुक्तांचा ठेकेदारांना सवाल

विक्रांत मते

नाशिक : पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. वाहने नादुरुस्त होण्याबरोबरच आरोग्याच्या ही समस्या भेडसावत असल्याने या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेकेदारांची झाडाझडती घेतली.

सध्या तुम्ही शहरातील रस्त्यांवर फिरले आहात काय, रस्त्यांची स्थिती तुम्हाला जाणवत नाही का, असा प्रश्नांचा भडिमार करत उत्तरे जाणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेकेदारांनी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने अखेरीस अंतिम नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. (nmc commissioner final notice warning to contractors over potholes in city nashik news)

सात- आठ वर्षांपूर्वी राज्यातील शहरांमध्ये नाशिकच्या रस्त्यांची उदाहरणे दिली जात. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना नाशिकचे रस्ते पाहून या, असा सल्ला दिला जात होता. अशी ख्याती नाशिकच्या रस्त्यांची होती. परंतु, दोन- अडीच वर्षांपासून रस्त्यांवर झालेला खर्च व सततच्या पावसामुळे रस्त्यांची झालेली चाळण लक्षात घेता शहराच्या या चांगलेपणाला बट्टा लागला आहे.

भाजप सत्ताकाळात झालेल्या या रस्त्यांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असले तरी त्याचा फायदादेखील निवेदनापुरता मर्यादित राहिलेल्या विरोधी पक्षांना करून घेता येत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांचा रोष वाढत असताना लाजेकाजे का होईना बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.

नोटिसा बजावल्यानंतरदेखील नागरिकांचा रोष काही कमी होत नाही. त्यात भाजपला निवडणुकांची भीती वाटू लागल्याने रस्ते कामांवर पांघरून घालण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे.

ठेकेदारांची झाडाझडती

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून यापूर्वी १४ ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. आज त्यातील काही ठेकेदारांची बैठक आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी घेतली. तुम्ही रस्त्यांवरून फिरत नाही का, रस्त्यांवर खड्डे किती, अशा प्रश्नांची सरबत्ती करत कठोर कारवाईच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. त्याचबरोबर गुणवत्ता व नियंत्रण विभागावरदेखील ताशेरे ओढत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ठेकेदारांना अंतिम नोटीस देऊन त्यानंतर सुधारणा न झाल्यास काळ यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गणेश उत्सवापूर्वी दुरुस्ती

पुढील आठवड्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी तीन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांनी रस्ते तातडीने दुरुस्त करावे. रस्त्यांवरील खड्डे मोजून बुजवावेत व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गुणवत्ता विभागाने जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT