Students participating in a cultural program on the occasion of Independence Day. esakal
नाशिक

NMC सांस्कृतिक महोत्सव : कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मिळविली दाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नाशिक महापालिकेतर्फे ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून सुरू असलेल्या महोत्सवाचा बुधवारी (ता. १७) सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समारोप झाला. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. (NMC Cultural Festival 2022 Students won program Nashik Latest Marathi News)

महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महाकवी कालिदास कला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे व आशिया खंडातील पहिल्या महिला शरीरसोष्ठवपटू स्नेहा कोकणे या वेळी प्रमुख पाहुणे होते. शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

या वेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त खाडे म्हणाले, की बलशाली भारत होण्यासाठी नवीन पिढी सशक्त होणे गरजेचे आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती, पुलवामा हल्ला, बळीराजाची व्यथा, लोकसंस्कृती, आदिवासी नृत्य सादर करत प्रेक्षकांची दाद मिळविली. पुष्पाताई हिरे माध्यमिक विद्यालयाच्या ‘इडापीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’ या विषयावरील सादरीकरण सर्वाधिक टाळ्यांना पात्र ठरले.

विजन अकादमीतर्फे सेव्ह द सॉइल हा विषय समूहनृत्यातून मांडण्यात आला. वाघ गुरुजी शाळेचे आदिवासी नृत्य, प्रणीत विद्यालयाचे पुलवामा हल्ला, महापालिकेच्या शाळा क्रमांक २१ व शाळा क्रमांक ७३ व शाळा क्रमांक १८, तसेच के. के. वाघ शाळा, प्रशांतदादा हिरे माध्यमिक विद्यालय, नवरचना स्कूल, रचना विद्यालय, एमराल्ड हाइट इंग्लिश स्कूल या शाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या शाळांच्या प्रमुखांना या वेळी गौरविण्यात आले. उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर, डॉ. विजय मुंडे, उपायुक्त करुणा डहाळे आदी या वेळी उपस्थित होते.

स्वच्छ शाळा पुरस्कार प्रदान

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी व के. के. वाघ विद्यालय, सरस्वतीनगर या शाळांना स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच लेह-लडाख सायकल वारी करणाऱ्या शिक्षिका अर्चना सांगळे, नाशिक-कन्याकुमारी सायकल स्वारी करणारे महापालिकेचे शिक्षक गणेश लोहार, लघुचित्रपटांद्वारे प्रबोधन करणारे जागतिक पुरस्कारप्राप्त महापालिकेचे शिक्षक नामदेव जानकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT