A sack of sacks applied to the dangerous area esakal
नाशिक

NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागीय कार्यालयाच्या धोकादायक भागाचे येत्या दोन दिवसात काम सुरू करायचे आहे, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यामुळे धोकादायक भागास लागून असलेल्या विभागाचे अन्य ठिकाणी घाईघाईने स्थलांतर करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पंधरा दिवस उलटून अद्याप कामे सुरू झाले नाही. (NMC Eastern Divisional Office work has not started yet After 15 days nashik news)

मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालय इमारतीच्या धोकादायक भागाची दुरुस्ती करण्याचे गेल्या १५ दिवसांपूर्वी निश्चित झाले होते. दोन दिवसात काम सुरू करायचे आहे, असे सांगत धोकादायक भागास लागून असलेल्या भागात विविध कर विभागाचे कार्यालय आणि खालच्या मजल्यावर स्टोअर रूम तातडीने रिकामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार विविध कर विभाग इमारतीच्या अन्य भागात स्थलांतरित करण्यात आले. स्टोअर रूममधील वस्तूदेखील बाहेर काढण्यात आल्या आहे. पंधरा दिवसांपूर्वी अशा प्रकारची कामे करून दुरुस्तीच्या कामासाठी जागा मोकळी करून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप येथील दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.

गेल्या तीन वर्षापासून अशाच प्रकारे निधी मंजूर आहे. लवकरच काम सुरू होणार आहे, असे आश्वासन ऐकावयास मिळत आहे. तर, दुसरीकडे धोकादायक भागास तीन वर्षांपूर्वी मुरूम आणि वाळूने भरलेल्या गोण्यांचा पहाड बनवून ठेका देण्यात आला आहे. त्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. धोकादायक भाग तर नंतर तो पहाडच कधीही कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

आजारापेक्षा उपचार भयानक झाल्याची परिस्थिती सध्या या ठिकाणी आहे. शिवाय धोकादायक भाग अधिकच धोकादायक झाला आहे. लवकरच काम सुरू झाले नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

शौचालयामुळे काम रखडले

सध्या इमारतीमध्ये विविध विभाग आहे. त्यात अनेक कर्मचारी कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेले दोन शौचालय धोकादायक भागास लागून आहे. दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी शौचालय हटविणे आवश्यक आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे. त्या भागातील महत्त्वाचे कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT