Demonstration of fire robot at municipal headquarters
Demonstration of fire robot at municipal headquarters esakal
नाशिक

NMC Fire Department: आग विझविण्यासाठी ‘फायर रोबोट’!

सकाळ वृत्तसेवा

NMC Fire Department : महापालिकेच्या अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता व ९० मीटर उंचीवर पोचणारी हायड्रोलिक शिडीचा वाद कायम असतानाच आता अग्निशमन विभागाने आग विझविण्यासाठी फ्रान्सच्या कंपनीकडून रिमोटवर चालणारे फायर रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे. (NMC Fire Department Fire Robot to extinguish nashik)

बॅटरीवर चालणाऱ्या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (ता. २७) महापालिका मुख्यालय आवारात सादर केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, शार्क रोबोटीक्स कंपनी प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

बॅटरीवर चालणारा रोबोट आहे. एका चार्जिंगमध्ये किमान बारा तास यंत्र चालविता येते. एक बॅटरी स्टॅन्डबाय ठेवण्याची सुविधा असल्याने यंत्राद्वारे सलग २४ तास आग विझविण्याची क्षमता आहे. बॅटरी चार्जिंगसाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो.

रोबोटची चेसीज उच्चप्रतीच्या धातूची असल्याने ८०० अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमानातही काम होते. रोबोटवरचा वॉटर मॉनिटर ६० मीटरपर्यंत थ्रो देणार आहे. फायर रोबोट इमारतीचा जिना चढू शकतो.

रोबोटिक यंत्राचे ब्रेक हे इलेक्ट्रो मॅग्नेटिक आहेत. प्रकाशयोजनेसाठी एलईडी सुविधा आहे. थर्मल इमेजिंग कॅमेरा रिमोटद्वारे पाचशे मीटर अंतरापर्यंत मानवरहित यंत्र काम करते.

तळघर, केमिकल कंपनी, गॅस गळती, इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्यानंतर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी फायर रोबोट उपयोगी ठरणार आहे.

अशा प्रकारच्या घटनांमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या जीविताला निर्माण होणार धोका टाळता येवू शकतो, असा दावा मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT