NMC News esakal
नाशिक

NMC News: गंजमाळ झोपडपट्टी खाली करणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरकुल योजनेत घर मिळूनही झोपडीचा ताबा न सोडणाऱ्या झोपडपट्टीधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

घरकुल योजनेत घर मिळालेल्या जवळपास दीडशे नागरिकांकडून गंजमाळ येथील झोपडपट्टीतील घरे खाली करून घेतले जाणार आहे. (NMC News Ganjmal slum to be demolished nashik)

केंद्र व राज्य सरकारकडून २००७ व २००८ मध्ये झोपडपट्टीतील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत महापालिकेकडून जागांची निवड करून तेथे घरकुल योजना राबविण्यात आली.

तेथे झोपडपट्टीधारकांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जवळपास सहा हजार घरांची निर्मिती करण्यात आली. यातील गंजमाळ श्रमिकनगर येथील ३००५ झोपड्यांची नोंद करण्यात आली.

३०५ झोपड्यांपैकी २१५ झोपडी धारकांनी घरकुल योजनेत समाविष्ट होण्यासाठी नोंदणी केली. २१५ पैकी १५० झोपड्यांसाठी घरकुले मंजूर करण्यात आले. वडाळा व चुंचाळे येथे घरकुल योजनेअंतर्गत ताबा मिळूनही झोपडपट्टीचा ताबा सोडला नसल्याची बाब सर्वेक्षणात आढळून आली.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण व घरकुल योजना विभागाकडून श्रमिकनगरच्या घरकुल मिळालेल्या दीडशे झोपडीधारकांकडून झोपडी खाली करून घेतली जाणार आहे, अशी माहिती अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT